प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:35 IST2021-03-11T23:34:37+5:302021-03-11T23:35:43+5:30
वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे व इतर देयके निकाली काढणे, थकीत वेतन अदा करण्यात यावे, माहे मार्चचे कपात केलेले २५ टक्के वेतन अदा करावे, सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती करावे, मूळ व दुय्यम सेवापुस्तक अद्ययावत करण्यात यावे, वरिष्ठ निवड श्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर करण्यात यावे, शाळेचे विद्युत बिल ग्रामपंचायतने भरणे, शिक्षकांच्या रिक्त पदावर काम करत असलेल्या स्वयंसेवकांचे थकीत मानधन देण्यात यावे, वेतन तफावत प्रकरणे निकाली काढणे, आदी विविध विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली.

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवा
लाेकमत न्यूज नेटवर्क
पवनी : शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासह अनेक मुद्द्यांवर गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्याशी बुधवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, तालुका पवनीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी तालुकाध्यक्ष दिगांबर जिभकाटे, गटशिक्षणाधिकारी एन. टी. टिचकुले , शिक्षण विस्तार अधिकारी विजय भुरे, आदी उपस्थित होते.
वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे व इतर देयके निकाली काढणे, थकीत वेतन अदा करण्यात यावे, माहे मार्चचे कपात केलेले २५ टक्के वेतन अदा करावे, सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती करावे, मूळ व दुय्यम सेवापुस्तक अद्ययावत करण्यात यावे, वरिष्ठ निवड श्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर करण्यात यावे, शाळेचे विद्युत बिल ग्रामपंचायतने भरणे, शिक्षकांच्या रिक्त पदावर काम करत असलेल्या स्वयंसेवकांचे थकीत मानधन देण्यात यावे, वेतन तफावत प्रकरणे निकाली काढणे, आदी विविध विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली.
विषयसूचीतील सर्व विषय निकाली काढण्यासाठी गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी २२ मार्चपर्यंतचा कालावधी शिक्षण विभागाला दिला आहे. प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी संजीव बावनकर, रमेश काटेखाये, रमेश लोणारे, बी. के. मेश्राम, अनिरुद्ध नखाते, रामरतन मोहुर्ले, प्रकाश आलोने, अनिल मरस्कोल्हे, राम पवार, उमेश खेडकर, विमोश चव्हाण, प्रीती कोचे व इतर संघ पदाधिकारी होते. संचालन उत्तम कुंभारगावे व सुधीर माकडे यांनी केेले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.