शांती, एकोपासाठी शहरात एकता रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:31 IST2017-08-13T23:31:04+5:302017-08-13T23:31:32+5:30
देशात वाढत असलेली अशांती, घृणा, द्वेष दुर सारण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून वाईट प्रवृत्तींना दूर सारले पाहिजे, ....

शांती, एकोपासाठी शहरात एकता रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशात वाढत असलेली अशांती, घृणा, द्वेष दुर सारण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून वाईट प्रवृत्तींना दूर सारले पाहिजे, हा उदात्त दृष्टीकोन समोर ठेवून भंडारा शहरात रविवारी सकाळी ११ वाजता शांती व एकोपासाठी एकता रॅली काढण्यात आली. शिस्तबध्द पध्दतीने काढण्यात आलेल्या या रॅलीची शहरात चर्चा होती.
ही एकता रॅली जमीयत उलमा-ए-हिंद, विश्व हिंदु परिषद, भारतीय कम्युनिस्ट पार्टी शाखा भंडारा, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय, ग्रिन हेरिटेज संस्था, पतंजली योग समिती व जमाते ईस्लामे हिंद आदी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आली होती.
मुस्लीम लायब्ररी चौकातून निघालेल्या या रॅलीमध्ये जमीयत उलमा-ए-हिंद चे अध्यक्ष मुफती मोहमद साजीद, हिवराज उके, मो. सईद शेख, हाफीज असरार, हाफीज इमरान, कारि अय्युब, सदानंद इलमे, वामनराव चांदेवार, ब्रम्हकुमारीच्या संध्या दिदी, रागीनी दीदी, इश्वरलाल काबरा, मयुर बिसेन, सचिन घनमारे, हाफिज अबरार, शैलेंद्र श्रीवास्तव, राजकुमार राऊत, संजीव मते, सतीश सार्वे, बंटी अग्रवाल, प्रा. राहुल मेश्राम, काजी याकुब यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. रॅलीचा समारोप त्रिमुर्ती चौकात उपस्थितांच्या मार्गदर्शनाने करण्यात आला.