देव्हाडा येथे फिरते माती परीक्षण

By Admin | Updated: July 10, 2014 23:28 IST2014-07-10T23:28:12+5:302014-07-10T23:28:12+5:30

देव्हाडा (बु.) येथे तीन दिवस फिरते माती परीक्षण प्रयोगशाळेत माती परीक्षण करण्यात आले. यावेळी कारखाना परिसरातील माडगी, मुंढरी, सिहोरा, मोहाडी, खापा, मिटेवानी, परसवाडा गटातील २५० ते ३००

The soil test runs around Devada | देव्हाडा येथे फिरते माती परीक्षण

देव्हाडा येथे फिरते माती परीक्षण

करडी : देव्हाडा (बु.) येथे तीन दिवस फिरते माती परीक्षण प्रयोगशाळेत माती परीक्षण करण्यात आले. यावेळी कारखाना परिसरातील माडगी, मुंढरी, सिहोरा, मोहाडी, खापा, मिटेवानी, परसवाडा गटातील २५० ते ३०० शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने परीक्षणासाठी आणले होते. सदर मातीच्या नमुन्याचे विनामुल्य परीक्षण करून देण्यात आले आणि परीक्षण झालेल्या नमुायंचे पृथ:करण अहवाल देण्यात आला. या अहवालात ऊस पिकासाठी वापरायचे रासायनिक खतोच प्रमाण व जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली.
परीक्षणाचे वेळी प्रयोगशाळेत वैनगंगा शुगर अँड पावर लि. देव्हाडा बु. चे उपाध्यक्ष दादासाहेब टिचकुले, वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद कुळकर्णी तसेच परिसरातील शेतकरी हजर होते. त्यांनी प्रयोगशाळेची पाहणी माती परीक्षणाबाबतची माहिती समजवून घेतली. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेणखत, कंपोष्टखत, हिरवळीचे खताचा वापर, आम्लधर्मी, अल्कधर्मी जमिनीतील नत्र, स्पुरद, पलाश इ. चे पृथकरण करून रासायनिक खतांचा संतुलीत वापर जमिनीचा पी.एच. सेंद्रीय कार्बनचे प्रमाण याबाबत ज्ञान मिळाल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी व दर्जेदार ऊस उत्पादन वाढीसाठी होऊ शकतो.
याकरिता राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लि. चे उपप्रबंधक ए.पी. नारळे, जिल्हा प्रभारी भंडारा व वरिष्ठ अधिकारी मातीपरीक्षण प्रयोगशाळा नागपूर तसेच लॅब इन्चार्ज योगेश दरवळकर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The soil test runs around Devada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.