सीमांकित पात्रात मातीच माती !
By Admin | Updated: July 1, 2014 01:17 IST2014-07-01T01:17:56+5:302014-07-01T01:17:56+5:30
ऐन पावसाळ्यात मध्य प्रदेश राज्याचा महसूल विभाग आंतरराज्यीय सीमेवरील मोवाड गावांच्या हद्दीत असलेला बावनथडी नदीचा पात्र रेती विक्री करण्यासाठी लिलावात काढत आहे. परंतु या पात्रात यंदा

सीमांकित पात्रात मातीच माती !
मोवाडचा रेतीघाट अडचणीत : राज्याच्या हद्दीतून उपसा होणार, रेतीचा रात्रंदिवस उपसा सुरुच, तस्कर झाले गब्बर
रंजित चिंचखेडे - चुल्हाड
ऐन पावसाळ्यात मध्य प्रदेश राज्याचा महसूल विभाग आंतरराज्यीय सीमेवरील मोवाड गावांच्या हद्दीत असलेला बावनथडी नदीचा पात्र रेती विक्री करण्यासाठी लिलावात काढत आहे. परंतु या पात्रात यंदा रेती ऐवजी मातीच माती असल्याने रेतीचा उपसा करताना अडचणीचे ठरणार आहे. लिलाव धारकांची भूमिका राज्याच्या हद्दीत असलेल्या रेतीवर राहणार आहे.
विदर्भात नदी पात्रातील रेती घाट लिलावात काढण्यात आले आहेत. सध्या या रेती घाटातून रेतीचा उपसा होत आहे. भंडारा जिल्ह्यात अल्प रेती घाट लिलावात काढण्यात आली आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रेतीचा उपसा धडाक्यात सुरु आहे. या रेतीची साठवणूक करण्यात येत आहे. पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहत असल्याने रेतीचा उपसा केला जात नाही.
आॅक्टोबर महिन्यापर्यंत घाट लिलावात असतानाही रेतीचा उपसा होत नाही. नदी पात्रात पाणीच पाणी राहत असल्याने रेतीचा उपसा करण्यास अडचण येत आहे. हीेच संधी साधून मध्यप्रदेश राज्याचा महसूल विभाग बावनथडी नदीचे पात्र लिलावात काढत आहे. बावनथडी नदीचे पात्र पावसाळ्यातही कोरडे राहत आहे. यामुळे रेतीचा उपसा करताना अडचणीचे ठरत नाही. विदर्भात रेतीचा तुटवडा निर्माण झाल्यास या रेती घाटांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत आहे. याच धर्तीवर आंतरराज्यीय सीमेवरील मोवाड गावाच्या हद्दीत असलेला बावनथडी नदी पात्रातील रेती घाट लिलावात काढण्यात येत आहे.
या घाटावरील संपूर्ण रेती विदर्भातील जिल्ह्यात आयात केली जात आहे. यामुळे मध्यप्रदेश राज्याला कोट्यवधींचा महसूल प्राप्त होत आहे. सिहोरा परिसरात बावनथडी आणि वैनगंगा नदी पात्रातील रेती घाट लिलावात काढण्यात आले नाही. या दोन्ही नद्यांवर धरणाचे बांधकाम करण्यात आल्याने नदी पात्रात पाणीच पाणी आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने रेती घाट लिलवाची प्रक्रिया सुरु केली असतानाही कुणी लिलाव धारकाने या प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. मोवाडचा रेती घाट लिलाव करताना भंडारा आणि नागपुरचे कंत्राटदार सहभाग घेत आहेत. रेतीचा उपसा करताना साऱ्यांना मॅनेज करण्याची प्रक्रिया हेच कंत्राटदार करीत आहेत. यंदा मात्र मोवाडचा रेती घाट लिलाव अडचणीत आलेला आहे. बावनथडी नदीचे पात्र बदलल्याने हे संकट निर्माण झाले आहे.
या नदी पात्रात महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत १२० मीटर लांब पात्र आहे. तर मध्यप्रदेश राज्याच्या हद्दीत मोवाड गावाच्या दिशेने ९३ मीटर पात्र आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेची विभागणी याच नदीच्या पात्राने झाली आहे. नदीचे पात्र गेल्या वर्षात बपेरा गावाच्या दिशेने बदलले आहे. या शिवाय मोवाड गावाच्या दिशेने मातीचा भरणा निर्माण झालेला आहे. या गावाच्या हद्दीतील पात्रात मातीच माती असल्याने रेतीचा उपसा अडचणीचा ठरणार आहे.
या गावांच्या हद्दीत ५४ मिटर लांब नदी पात्रात रेतीऐवजी माती असल्याची माहिती आहे. उर्वरित ३९ मीटर नदी पात्रात अल्प रेतीचे प्रमाण आहे. यामुळे रेती घाट लिलाव झाल्यास, महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतून रेतीचा उपसा करण्यावर कंत्राटदारांची भूमिका राहणार आहे.
रेतीचा उपसा करण्यासाठी कंत्राटदारांची जेसीबी मशीन दाखल झाली आहे. रेतीचा उपसा कुठून करावा हेच कंत्राटदारांना कळेनासे झाले आहे. दरम्यान नदी पात्रात दोन्ही राज्याचे महसूल विभाग हद्द सीमांकीत करीत नाहीत. ही कारवाई हेतुपुरस्सररीत्या टाळण्यात येत आहे. या रेती घाटाचे तार नागपूरपर्यंत जोडले जात असल्याने रेतीची ओव्हरलोडेड चोरी उपसा करण्याचा अनधिकृत कालावधी वन कायदा तथा अन्य निकषासाठी नियमांना बगल दिली जाते.
पावसाळ्यात अन्य घाटांवरून रेतीचा उपसा बंद राहतो. याच कालावधीत रेतीची मागणी वाढत असल्याने किंमत ही आकाशाला भिडत आहे. शासकीय इमारतीचे बांधकाम याच कालावधीत होत असल्याने बडे कंत्राटदार रेतीची किंमत मोजायला तयार असतात. एरवी आठ महिने बंद असलेला मोवाडची रेती घाट लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.