सामाजिक परिवर्तनासाठी समाजबांधवांनी सज्ज राहावे
By Admin | Updated: May 8, 2017 00:24 IST2017-05-08T00:24:59+5:302017-05-08T00:24:59+5:30
: कुंभार समाज विकास व अधिकारापासून दूर आहे. समाजात दारिद्रय आहे. त्यामुळे कुंभार समाजाने सामाजिक लढाईसाठी तयार असले पाहिजे.

सामाजिक परिवर्तनासाठी समाजबांधवांनी सज्ज राहावे
चरण वाघमारे : मुंढरी येथे कुंभार समाजाचा सामूहिक विवाहसोहळा; सात जोडपी अडकली विवाहबंधनात
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कुंभार समाज विकास व अधिकारापासून दूर आहे. समाजात दारिद्रय आहे. त्यामुळे कुंभार समाजाने सामाजिक लढाईसाठी तयार असले पाहिजे. जोपर्यंत सामाजिक लढा देणार नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती शक्य नाही. त्यासाठी समाजबांधवांनी तयारी ठेवावी, आपसातील मतभेद बाजुला सारावे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केले.
मुंढरी (बुज) येथे रविवारला पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळया प्रसंगी ते बोलत होते. मुंढरी बुज येथे नवआकार कुंभार समाज बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या ७०० व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून समाजातील उपवर वधुंचा सामूहिक विवाह सोहळा व गोपालकाला संत गोरोबा काका समाज मंदिरात पार पडला.
या सामूहिक विवाह सोहळयात सात जोडपी विवाहबद्ध झाले. त्या अगोदर ह.भ.प. नामदेव बोरसरे महाराजांचे हस्ते गोपालकाला, किर्तन व दहीहंडी फोडण्यात आली.
विवाह सोहळयाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार चरण वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे, महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघाचे सुरेश हिरे, सरपंच माधुरी उईके, अध्यक्ष संजय गाते, महासंघाच्या महिला अध्यक्ष जामकर, पुलगावच्या नगराध्यक्षा शितल गाते, ब्रम्हमुर्ती शेषानंद पांडे, मानस कारखान्याचे मिलींद कुलकर्णी, कान्हळगावचे उपसरपंच दिगांबर कुकडे, पंचायत समिती सदस्य विशाखा बांडेबुचे, बाबूजी ठवकर, ह.भ.प. नामदेव बोरसरे, के.बी. चौरागडे, उपसरपंच क्रिष्णा शेंडे, निशिकांत इलमे, डेजराज चौरागडे, महेश निमजे, सुनिल ठवकर, वासूदेव गोमासे, सर्वेश राजाभोज, पंकज निमजे, दिलीप कुंभारे, अश्विन डोहळे, कुंभार समाज संस्थेचे अध्यक्ष रमेश बुरबादे, सचिव सुरेश रुद्राक्षवार, शामकला मालदे, गोविंद ठाकरे, गोपाल घाटेकर, श्रीधर पाठक, सुर्यभान वरवाडे, बळीराम वरवाडे, शामलाल ढेकले, तेजराम उमरे, डोमेश्वर ढेकले, मुकेश ढेकले, केशव मालधे व अन्य मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.
यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी रतन ढेकले, लक्ष्मण पराते, कैलाश वरवाडे, अतुल हेडावू, शाम वरवाडे, प्रकाश उके, संजय ढेकले, ईश्वर मेश्राम, रोशन बोंदरे, राजू सोनवाने, महादेव गोमासे, आशिष चौरागडे,
सुरेश सार्वे, अरविंद दलाल, प्रकाश चकोले, भोलेश्वर शेंडे, खुशाल अंबादे, बंडू सोनवाने, ओम गोखले, प्रभाकर पासवान, यशवंत चौरागडे, सचिन कुंभारे, प्रकाश बांडेबुचे, प्रकाश फुलसुंगे, प्रभाकर शेंडे, प्रशांत मस्के, जिवन शेंडे, हेमराज गोन्नाडे, प्रशांत लाडसे, गरीब मालदे, मनोज देव्हारे, रणजित मेश्राम, राकेश मेश्राम, सागर शेंडे, रोहीत शेंडे, योगेश निमजे, सुधाकर कुंभारे आदींनी सहकार्य केले.
वऱ्हाड्यांना थंड पाणी व नास्ता
४कुंभार समाज बांधव व गावातील तरुणांच्या वतीने वरांच्या जनवस्याची व्यवस्था जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत करण्यात आली. सहळ्यासाठी दूरवरुन आलेल्या वऱ्हाड्यांसाठी कोणत्याही प्रकारची असुविधा होवू नये यासाठी तरुणांनी आलू पोह्याची सोय केली. तसेच थंड पिण्याचे पाणी वऱ्हाड्यांना दिले. .