शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
6
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
7
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
8
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
9
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
10
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
11
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
12
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
13
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
14
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
15
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
16
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
17
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
18
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
19
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
20
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

मतदार व लोकशाहीचे मीडियावर 'सोशल मॅरेज'; मतदानासाठी निमंत्रणपत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 11:44 IST

Bhandara : नागरिकांनी मतदान करण्यासाठी विविध उपक्रमातून मतदान जनजागृती

विलास खोब्रागडे लोकमत न्यूज नेटवर्क सिल्ली / आंबाडी : देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदानाला फार महत्व आहे. नागरिकांनी मतदान करण्यासाठी विविध उपक्रमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. यात सोशल मीडिया अग्रेसर असून सध्या सोशल मीडियावर काय वायरल होईल याचा नेम नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी मतदार व लोकशाहीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे या अनोख्या निमंत्रणपत्रिकेने मतदारांचे लक्ष वेधले आहे.

२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. नागरिकांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी राज्य सरकारने सर्वजनिक सुटी जाहीर केली आहे. मात्र अनेक मतदार माझ्या एका मताने काय होणार? असा विचार करून मतदान करीत नाही. त्यामुळे राज्य सरकार मतदान अभियानाद्वारे पथनाट्य, एकपात्री नाट्य तसेच रॅली काढून मी प्रथम भारतीय व अंतिमतः भारतीय असून मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

मात्र मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव मतदार व भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या लोकशाही यांचा बुधवार दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजताच्या शुभ मुहूर्तावर विवाह संपन्न होत आहे. महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी तसेच उज्ज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल महाराष्ट्र विधानसभेत पाठविण्यासाठी आपल्या एक-एक मतदानरूपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा. यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर येण्याचे भारतीय लोक, कु. निळीशाई व चि. इव्हीएम यांनी निमंत्रण दिले आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या निमंत्रणपत्रिकेची सोशल मीडियावर तसेच मतदारांमध्ये चर्चा आहे.

निमंत्रण देण्याची पहिलीच वेळ साधारणतः शासकीय किंवा घरगुती कार्यक्रमाप्रसंगी निमंत्रणपत्रिका छापून मान्यवर पाहुणे तसेच आप्त स्वकीय नातेवाइकांना पत्रिका देऊन कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण दिले जाते. मात्र मतदारांनी आवर्जून मतदान करावे, यासाठी निमंत्रण देण्याची ही पहिलीच वेळ असावी.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019bhandara-acभंडाराSocial Mediaसोशल मीडिया