वैनगंगा प्रवाहाने खचलेल्या रस्त्याचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:01:04+5:30

गाव तिथे रस्ता असे ब्रीद सार्वजनिक बांधकाम खात्याचे आहे. रेंगेपार गाव वैनगंगा नदीकाठावर वसले आहे. गत १० ते १२ वर्षापासून नदीपात्र झपाट्याने गावाकडे आले आहे. घरे व रस्ता यांचे अंतर केवळ दोन ते तीन फुटावर आले आहे. शासनाने घर पुर्नवसनाची कारवाई केली. परंतु मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता बांधकामाला आजपर्यंत परवानगी दिली नाही.

The soaked blanket of the road that was drenched by the Wanganga stream | वैनगंगा प्रवाहाने खचलेल्या रस्त्याचे भिजत घोंगडे

वैनगंगा प्रवाहाने खचलेल्या रस्त्याचे भिजत घोंगडे

googlenewsNext
ठळक मुद्देरेंगेपार येथील प्रकार : पाहणी झाली, अद्याप कार्यवाही नाही, बससेवा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : वैनगंगा नदीच्या पात्र विस्ताराने रेंगेपार गावाचा रस्ता खचला असून यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. बायपासचा प्रश्नही प्रलंबित असून बांधकाम विभागाचे अभियंते केवळ पाहणी करून गेलेत. दुसरीकडे या मार्गावरील बसही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
गाव तिथे रस्ता असे ब्रीद सार्वजनिक बांधकाम खात्याचे आहे. रेंगेपार गाव वैनगंगा नदीकाठावर वसले आहे. गत १० ते १२ वर्षापासून नदीपात्र झपाट्याने गावाकडे आले आहे. घरे व रस्ता यांचे अंतर केवळ दोन ते तीन फुटावर आले आहे. शासनाने घर पुर्नवसनाची कारवाई केली. परंतु मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता बांधकामाला आजपर्यंत परवानगी दिली नाही.
एका वर्षापुर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते यांनी पाहणी केली, परंतु अद्याप कारवाई झाली नाही. बायपास रस्त्याअभावी गावाची बससेवा बंद झाली आहे. तुमसर आगाराची बस कर्कापूर-रेंगेपार-परसवाडा अशी धावत होती, परंतु रेंगेपार येथील नदीकाठच्या धोकादायक रस्त्यामुळे बससेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ग्रामीण नागरिकांत प्रचंड असंतोष व्याप्त आहे. याबाबत वारंवार निवेदनही निवेदनही देण्यात आली आहे. परंतु प्रश्न कायम आहे. समस्या निकाली काढली नाही तर आंदोलनाचा इशारा पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी दिला आहे.

Web Title: The soaked blanket of the road that was drenched by the Wanganga stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.