शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी तालुक्यातील रेतीघाटांवर तस्करांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

मोहाडी तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. या नदीतील रेतीला सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यामुळेच रेती तस्करांनी गत काही वर्षांपासून आपला मोर्चा रेतीघाटांवर वळविला आहे. तालुक्यातील घाटांवर पहाटेपासून उशिरा रात्रीपर्यंत जेसीबीच्याद्वारे रेतीचे उत्खनन केले जाते.

ठळक मुद्देअद्याप लिलावच झाले नाही : सुकळी, ब्राम्हणी, चारगाव, ढोरवाडा घाटावर धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : वैनगंगेच्या रेतीला विदर्भात मोठी मागणी असल्याने मोहाडी तालुक्यातील रेती घाटावर तस्करांचा धुमाकूळ सुरु आहे. लिलाव झाले नसतानाही सुकळी, ब्राम्हणी, चारगाव, ढोरवाडा घाटावर रेतीचे खुलेआम उत्खनन होत आहे. या सर्व प्रकाराकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
मोहाडी तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. या नदीतील रेतीला सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यामुळेच रेती तस्करांनी गत काही वर्षांपासून आपला मोर्चा रेतीघाटांवर वळविला आहे. तालुक्यातील घाटांवर पहाटेपासून उशिरा रात्रीपर्यंत जेसीबीच्याद्वारे रेतीचे उत्खनन केले जाते. विना क्रमांकाच्या ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे ही रेती भंडारा मार्गे नागपूर, पारडी, रामटेक, मौदा येथे विकली जाते. वैनगंगेच्या सुकळी, ब्राम्हणी, चारगाव, ढोरवाडा, रोहा, बेटाळा घाटावर सध्या मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु आहे. नदीच्या तिरावरच रेतीचे साठे तयार केले जात आहे. येथून वाहनाद्वारे वाहतूक केली जाते. मोठ्या शहरामध्ये त्याची विक्री होत आहे.
सध्या एकाही घाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे शासनाला कोणतीही रक्कम न भरता रेतीची तस्करी केली जात आहे. मात्र या सर्व प्रकारात महसूल विभाग आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. तलाठी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरुन रेतीचा सपाटा लावला आहे. गत महिन्याभरापासून रेती तस्करांचा धुळगूस सुरु असून यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. उलट घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती मात्र मिळत नाही.
रेती माफीयांनी अनेक गुंड प्रवृत्तीचा तरुणांना हाताशी धरले आहे. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केला तरी ते कुणाला जुमानत नाही. सदर तरुण पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करुन असतात.
रेती घाटांकडे कुणी येत असल्यास त्याची माहिती तात्काळ मोबाईलवरुन संबंधित वाहनचालकांना दिली जाते. यामुळे एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याने कारवाईचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होत नाही.

कर्मचाऱ्यांची वाहने तस्करीत
तुमसर-मोहाडी तालुक्यात रेती व्यवसाय सोन्याची अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. त्यामुळे अनेकजण या व्यवसायात उतरले आहे. महसूल व पोलिसातील अनेक कर्मचाºयांनी वाहने घेऊन या व्यवसायात उतरविल्याची माहिती आहे. वाहनाच्या मुळ मालकांचा शोध घेतल्यास अनेक धक्कादायक प्रकार बाहेर येण्याची शक्यता आहे. यात कर्मचारीच गुंतल्याने वरिष्ठ कारवाई करण्यास मागेपुढे पाहतात.