Sleeping in the quarantine room costs teachers highly; Incident at Bhandara | क्वारंटाईन कक्षात झोपणे शिक्षकांना महागात पडले; भंडारा येथील घटना

क्वारंटाईन कक्षात झोपणे शिक्षकांना महागात पडले; भंडारा येथील घटना

ठळक मुद्देमोहाडीत गुन्हा दाखलपंचायत समिती कर्मचारी आढळला गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : क्वारंटाईन कक्षात झोपणे दोन शिक्षकांना चांगलेच महागात पडले. तहसीलदारांच्या तक्रारीवरुन मोहाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर क्वारंटाईन कक्षात गैरहजर असलेल्या पंचायत समिती सदस्यावरी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या भवनात क्वारंनटाईन केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रावर करडी शाळेचे शिक्षक एस.डी. आडे, आंधळगाव शाळेचे शिक्षक बी. ए. गजभिये आणि मोहाडी पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता आर.बी. दीपटे यांची नेमणूक करण्यात आली आहे. रविवार १० मे रोजी तहसीलदारांनी सदर क्वारंटाईन केंद्राला भेट दिली. तेव्हा दोन्ही शिक्षक झोपलेले आढळले, तर स्थापत्य अभि. सहा. हे गैरहजर असल्याचे निदर्शनात आले. कामात हयगय केल्याप्रकरणी इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार धनंजय देशमुख यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यत आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे कलम ५५,५६ व भादवि चे कलम १८८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Sleeping in the quarantine room costs teachers highly; Incident at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.