सरपंचाने केली वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:07 IST2018-03-17T23:07:12+5:302018-03-17T23:07:12+5:30
तालुक्यातील भागडी ग्रामपंचायतीच्या आवारात लावण्यात आलेले निंब, करंजी व अन्य प्रजातींच्या वृक्षांची विद्यमान सरपंचांनी कत्तल केली आहे. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी शासनाद्वारे वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे.

सरपंचाने केली वृक्षांची कत्तल
आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : तालुक्यातील भागडी ग्रामपंचायतीच्या आवारात लावण्यात आलेले निंब, करंजी व अन्य प्रजातींच्या वृक्षांची विद्यमान सरपंचांनी कत्तल केली आहे. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी शासनाद्वारे वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतच्या सरपंचाकडून वृक्षांची अवैद्यरित्या कत्तल केल्या जात आहे. यामुळे वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला गालबोट लागत आहे.
काही महिण्यापुर्वी पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायतच्या निवडणूकीमध्ये थेट जनतेतून निवडून आलेले भागडी ग्रामपंचायतचे सरपंच ताराचंद मातेरे यांनी ग्रामपंचायतच्या आवारातील निंब, करंजी यासह विविध प्रजातीच्या वृक्षांची कत्तल केली आहे. मात्र कत्तल करत असतांना ग्रामपंचायतच्या कोणत्याही सदस्यांला विश्वासात न घेतल्याचा आरोप नवनिर्वाचित उपसरपंच गणेश जिभकाटे यांनी केला आहे. ग्रामपंचायतच्या आवारासमोर वृक्षांची लागवड करण्यात आली. ग्रामपंचायतचे आवार सुशोभित दिसून, परिसरात शितलता राहत असायची. मात्र सरपंच मातेरे यांची याकडे डोळेझाक करत वृक्षांची कत्तल केली असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापजनक वातावरण दिसून आले. उपसरपंच पदाची निवडणूक अवैधरित्या घेण्यात आल्याने नव्याने पदरूढ झालेले सरपंच यांच्या विरोधी गटाचे उपसरपंच गणेश जिभकाटे, पप्पु मातेरे यांच्या निर्देशनात हा प्रकार येताच त्यांनी तहसिलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी, खंडविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.