सिलेंडरच्या स्फोटात सहा जण जखमी; जखमींना भंडारात हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 22:43 IST2020-10-14T22:41:32+5:302020-10-14T22:43:54+5:30
आलेसूर येथील घटना

सिलेंडरच्या स्फोटात सहा जण जखमी; जखमींना भंडारात हलविले
भंडारा: गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने सहा जण गंभीरित्या भाजल्या गेले. ही घटना तालुक्यातील आलेसूर सुधाकर निनावे यांच्या घरी बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींना उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल सुधाकर निनावे, सोनाली दीपक माहूरकर, गुणगुण दीपक माहुरकर, अनन्या अरुण दाते, शैलेश इंदल रोखडे व प्रतीक कैलास रोकडे सर्व रा. आलेसूर अशी जखमींची नावे आहेत. यापैकी गुणगुण ही दोन वर्षांची तर अनन्या तीन वर्षांची आहे.
शेजारी असलेले रोकडे कुटूंब निनावे यांच्याकडे आले होते. चहा करण्याकरिता सोनाली माहुरकर या स्वयंपाक खोलीत गेल्या. गॅस पेटविताच सिलिंडरचा स्फोट झाला. पाहता पाहता घराला आग लागली. यात अन्य पाच जणही आगीत सापडले. शेजाऱ्यांनी धाव घेत मदतीला प्रारंभ केला. मात्र तोपर्यंत सहा जण भाजल्या गेले. या सवार्ंवर तुमसर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.