खोदकामात आढळली चांदीची नाणी

By Admin | Updated: January 17, 2015 22:52 IST2015-01-17T22:52:44+5:302015-01-17T22:52:44+5:30

येथील मेंढा परिसरात असलेल्या प्राचीन गोसावी समाधी मंदिरालगत समाज मंदीराचे बांधकाम सुरू असताना मलब्याखाली चांदीची जुनी नाणी आढळून आली. हा प्रकार काल शुक्रवारी उघडकीला आला.

Silver coins found in kiosk | खोदकामात आढळली चांदीची नाणी

खोदकामात आढळली चांदीची नाणी

भंडारा : येथील मेंढा परिसरात असलेल्या प्राचीन गोसावी समाधी मंदिरालगत समाज मंदीराचे बांधकाम सुरू असताना मलब्याखाली चांदीची जुनी नाणी आढळून आली. हा प्रकार काल शुक्रवारी उघडकीला आला. पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मेंढा येथील भुशृंड गणेश मंदिरालगत गिरीवंशीय गोसावी समाधी मंदिरे आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार व सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यात सुरक्षा भिंतीसाठी जेसीबीने खोदकाम करण्यात आले. या ठिकाणावरून निघालेली माती व मलबा मंदिराच्या समोरील जागेवर टाकण्यात आला होता. ही जागा कहार समाजाची असून सध्या त्या ठिकाणी कहार समाज भवनाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सकाळच्यावेळी या भागात फिरायला आलेल्या काही नागरिकांना या जागेवर काही चांदीची नाणी आढळून आली. त्यांनी आणखी शोधाशोध केली असता अजुन काही नाणी सापडली. पहिल्या दिवशी या घटनेची वाच्यता केली नाही. मात्र हळुहळू ही गोष्ट अनेकांना झाल्याने दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही ती जागा उखरून जवळपास १०० ते १५० चांदीची नाणी अनेकांना सापडली. ही चांदीची नाणी सध्याच्या पाच रूपयांच्या स्वरूपातली असून वजन १० ते १२ ग्रॅम असे आहे. या नाणीवर उर्दू लिपित मजकूर अंकित असल्याने ही नाणी मोगलकालीन असावी, असा अंदाज आहे. गोसावी समाधी मंदिरे अतिशय प्राचिन असून जमिनीत गाडण्यात आलेले हे मटके मातीबरोबर बाहेर पडून फुटलेले असावी, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Silver coins found in kiosk