भंडारा : आर.एम. पटेल महिला कला महाविद्यालय भंडारा व भारतीय औषधी अनुसंधान संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सिकलसेल सप्ताहानिमित्त सिकलसेल तपासणी कार्यक्रम घेण्यात आला.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जुल्फी शेख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नितीन वानखेडे भारतीय औषधी अनुसंधान संस्था भंडारा, राहुल मटाले सिकलसेल तंत्रज्ञ, सामान्य रुग्णालय भंडारा उपस्थित होते. प्रास्ताविक मार्गदर्शन नितीन वानखेडे यांनी केले. राहुल मटाले यांनी सिकलसेल तपासणीची प्रक्रिया समजवून सांगितली. या कार्यक्रमात एकूण ६४ विद्यार्थिनींनी तपासणी केली. संचालन लोकेश बनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. किशोरदत्त पाखमोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. गोवर्धन धोटे, प्रा. कैलास ईश्वरकर, प्रा. राहुल भोरे, दादा भागडकर, बबीता भोंडेकर यांनी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)
पटेल महिला महाविद्यालयात सिकलसेल तपासणी कार्यक्रम
By admin | Updated: December 17, 2015 00:50 IST