चिचाळ अ‍ॅलोपेथिक दवाखाना डॉक्टरविना आजारी

By Admin | Updated: January 15, 2015 22:47 IST2015-01-15T22:47:01+5:302015-01-15T22:47:01+5:30

स्थानिक अ‍ॅलोपॅथिक दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची नोकरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे लावण्यात येत असल्याने शिपाई दवाखाना उघडून बसतो. डॉक्टरविना दवाखाना आजारी पडला आहे.

Sick allopathic clinic doctor | चिचाळ अ‍ॅलोपेथिक दवाखाना डॉक्टरविना आजारी

चिचाळ अ‍ॅलोपेथिक दवाखाना डॉक्टरविना आजारी

प्रकाश हातेल - चिचाळ
स्थानिक अ‍ॅलोपॅथिक दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची नोकरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे लावण्यात येत असल्याने शिपाई दवाखाना उघडून बसतो. डॉक्टरविना दवाखाना आजारी पडला आहे. दवाखाना परिचराच्या भरवश्यावर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. नाहीलाजास्तव रुग्णांना झोलाछाप डॉक्टर कडून इलाज करावा लागत आहे.
येथील लोकसंख्येचा विचार लक्षात घेता येथे आयुर्वेदिक दवाखान्याची स्थापना झाली. कालांतराने लोकसंख्येचा विचार लक्षात घेता आयुर्वेदिक दवाखान्याचे रूपांतर आॅग्ल दवाखान्यात केले. मोळकडीस आलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या दवाखान्याला भव्य इमारत बांधून दिली. दवाखान्याच्या स्थानांतराबरोबर आॅग्ल दवाखान्याचेही पदोन्नती होवून अ‍ॅलोपॅथिक दवाखान्यात रूपांतर झाले. लोकार्पण सोहळा पार पडला.
अ‍ॅलोपॅथिक दवाखान्याला भव्य दिव्य इमारत आहे. प्रसुतीगृह, वैद्यकीय तपासणी कक्ष औषधी वितरण कक्ष आदी दवाखान्यात सुव्यवस्थीत पुर्तता शासनाने केली आहे. प्राथमिक उपकेंद्राची इमारत जीर्ण झाल्याने भिंतींना तडे गेले. केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. प्राथमिक उपकेंद्राला बांधकामाला शासनाने मंजूरी प्रदान केली आहे. प्रसुतीसाठी महिलांची पायपीट होत आहे. त्यांना कोंढा अड्याळ येथे हलवावे लागत आहे. चिचाळ अ‍ॅलोपॅथिक दवाखान्याला मोठी सुसज्ज इमारत आहे. येथे प्रसुतीगृहाची वेगळी व्यवस्थाही केली आहे. दवाखान्याला संपूर्ण कर्मचारी मिळाले आहे. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची सेवा कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून तीन वेळा लावण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे शिबिर असल्यास त्या दवाखान्याला कुलूप ठोकूण हजेरी लावावी लागते. तर दवाखान्यात कर्मचारीच नाही तर दवाखान्याचा उपयोग काय, असा सवाल आहे.

Web Title: Sick allopathic clinic doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.