भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र नृसिंह टेकडी

By admin | Published: January 7, 2016 01:05 AM2016-01-07T01:05:20+5:302016-01-07T01:05:20+5:30

जिल्ह्यातील तुमसर शहरांपासून अवघ्या आठ कि़मी. तुमसर-गोंदिया राज्यमार्ग भंडारापासून ३५ कि़मी व नागपूरहून सुमारे ९० कि़मी.

Shrimshatra Nrishingh Tekdi of the devotees | भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र नृसिंह टेकडी

भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र नृसिंह टेकडी

Next

स्थानिकांना मिळतोय रोजगार : नदीक्षेत्र फुलले भाविकांनी
भंडारा : जिल्ह्यातील तुमसर शहरांपासून अवघ्या आठ कि़मी. तुमसर-गोंदिया राज्यमार्ग भंडारापासून ३५ कि़मी व नागपूरहून सुमारे ९० कि़मी. अंतरावर नृसिंह टेकडी माडगी देव्हाडा येथे वैनगंगेच्या पवित्र कुशीत मोठ्या दगडांच्या टेकडीवर नृसिंहाचे प्राचीन व जागृत मंदिर विद्यमान आहे. संपूर्ण भारत वर्षात मंदिराकरिता विशिष्ठ स्थान मिळणे दुर्लभच.
निसर्गनिर्मित खडकाळ भागात नदीच्या मध्य पात्रात विसावलेले हे आगळेवेगळे पुरातन, ऐतिहासिक मंदिर आहे. मंदिरात मूर्तींची स्थापना देखिल पुरातन काळी झाल्याची माहिती आहे. मंदिरात दोन मूर्ती असून एक उग्र स्वरूपाची तर दुसरी शांत स्वरूपाची या परिसरात वैनगंगा नदीचे दोन भाग होवून आजुबाजूला उंच झाडे आहेत.
टेकडी समोरील भागाला पाण्याचा प्रवाह शिघ्र असतो. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार आहे. एक रूंद चबुतऱ्यांच्या दोन्ही बाजूला एक मजबूत सिमेंटचे परकोटे बनलेले असून दर्शनास येणाऱ्या आबाल वृद्धांना कसलीही पडण्याची भिती नसते.
या चबुतऱ्याच्या किनाऱ्यावर गालचिरी नामक देवीची मूर्ती आहे. तसेच हनुमंतांची विशालकाय मूर्ती आहे. भिंतीच्या कोपऱ्यात काही देवी देवतांच्या मूर्ती आहेत. येथूनच श्री नृसिंह भगवानाची ६ फूट उंच विशालकाय मूर्ती दिसते. संतश्री अन्नाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य या देवस्थानातच सेवाकरीत घालविले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा येथे काही काळ वास्तव्य केले असता त्यांची सुद्धा येथे मूर्ती आहे. लोखंडी शिडीद्वारे उंच असलेल्या सभामंडपावर चढून आसमंतातील ईश्वरचा परिसर न्याहाळता येतो.ब्रम्हलीन श्री १००८ राजयोगी श्री संत हनुमानदास अण्णाजी महाराज यांचा ९, १०, ११ जानेवारीला पूण्यतिथी व भगवान नृसिंह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संक्रांतीपर्यंत अनेक कार्यक्रमाची रेलचेल राहणार असून भाविकांनी हे तीर्थक्षेत्र फुलणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shrimshatra Nrishingh Tekdi of the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.