शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

करडी परिसरात युरियाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:33 IST

करडी (पालोरा): - उन्हाळी पिकांची देखभाल व योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. परंतु, परिसरातील एकाही कृषी केंद्रात ...

करडी (पालोरा): - उन्हाळी पिकांची देखभाल व योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. परंतु, परिसरातील एकाही कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध नसल्याने पैसे घेऊन मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील शेतकरी वणवण भटकत आहेत. युरियावर अधिक नफा मिळत नसल्याने कृषी केंद्र चालकांनीच तुटवडा निर्माण केल्याचे सांगितले जात आहे.

करडी परिसरात उन्हाळी धानाच्या रोवण्या पूर्ण झाल्या असून धान पालवीवर सुटले आहे. मात्र, कृषी दुकानांमध्ये शेतीसाठी लागणारे युरिया खत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मार्च महिन्यापासून युरिया खताचा साठा संपल्याचे दुकानदार सांगत आहेत. खेड्यापाड्यातील कृषी केंद्रांमध्ये युरियाचा तुटवडा असल्याने शेतकरी थेट तालुक्याच्या ठिकाणी युरिया खत घेण्यासाठी येत असतात. मात्र, तिथेसुद्धा युरिया खत उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या कृषी केंद्र चालकांकडे युरिया उपलब्ध आहे. ते कृषीसेवा केंद्र चालक युरिया खताचा तुटवडा दाखवून जादा भावाने विक्री करीत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून वेळेवर खत न मिळाल्यामुळे शेतीच्या पुढील उत्पन्नावर त्याचा परिमाण होत आहे.

ज्या कृषी केंद्र संचालकांकडे युरिया खते नाहीत, त्यांनी तातडीने खते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन जे कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करीत असतील, अशा कृषी दुकानदारांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे .