शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
5
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
6
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
7
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
8
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
9
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
10
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
11
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
12
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
13
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
14
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
15
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
16
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
17
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
18
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
19
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
20
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

रस्त्यावर दुकाने; नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

राजीव गांधी चौक ते नगरपालिका चौक आणि गांधी चौक ते पोस्ट ऑफीस पासून बसस्थानक परिसरापासून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाºया रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेकडूनच अभय मिळत आहे की काय असे दिसून येत आहे. या दोन्ही मार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यालगत असलेले बांधकाम, दुकानांचे शेड, टपऱ्या, भाजी विक्रेते, हातगाड्या अशा अतिक्रमणांनी रस्ता व्यापून गेल्याचे दिसून येते. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.

ठळक मुद्देपालिका व वाहतूक विभागाचे अभय : अतिक्रमणात दडले शहराचे सौंदर्य, जबाबदारी कुणाची?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील रस्ते सुधारण्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण रस्त्याची अवस्था सुधरताना दिसत नाही. कारण शहरातील बहुतांश रस्त्यांवर दुकानदार अतिक्रमण करीत आहेत. दुकानातील साहित्य फुटपाथवर मांडले जाते. त्यात आणखी भर पडत आहे. असेच काहीसे चित्र राजीव गांधी चौक ते गांधी चौक येथील गांधी चौक आणि मोठा बाजार परिसर ते त्रिमूर्ती चौकमार्गे बसस्थानक जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी दिसून येत आहे.राजीव गांधी चौक ते नगरपालिका चौक आणि गांधी चौक ते पोस्ट ऑफीस पासून बसस्थानक परिसरापासून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाºया रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेकडूनच अभय मिळत आहे की काय असे दिसून येत आहे. या दोन्ही मार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यालगत असलेले बांधकाम, दुकानांचे शेड, टपऱ्या, भाजी विक्रेते, हातगाड्या अशा अतिक्रमणांनी रस्ता व्यापून गेल्याचे दिसून येते. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.शहरातील रस्ते सुधारण्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण रस्त्याची अवस्था सुधारताना दिसत नाही. कारण शहरातील बहुतांश रस्त्यांवर दुकानदार अतिक्रमण करीत आहेत. दुकानातील साहित्य फुटपाथवर मांडले जात आहे. त्यामध्ये दररोज आणखी भर पडत आहे.या मार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यालगत असलेले बांधकाम, दुकानांचे शेड, टपऱ्यां, भाजी विक्रेते, हातगाड्या अशा अतिक्रमणांनी रस्ता व्यापून गेल्याचे दिसून येते. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालक आणि पादचाºयांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.चौकाच्या शेजारीच फूड प्लाझा, गॅरेज आहे. शिवाय पार्र्किंगची सुविधाच नसल्याने या ठिकाणी येणारे खवय्ये आपली वाहने थेट रस्त्यावरच उभी करुन मोकळे होतात. शिवाय चौकात असलेल्या हॉटेल आणि गॅरेजसमोर उभी केलेली वाहनेही रस्त्यावर येत असल्याचे दिसून येते. फळविक्रेते, रिक्षा आणि टपºयांमुळेही हा चौक अतिक्रमाणाच्या विळख्यात सापडला आहे. सायंकाळनंतर तर परिस्थीति आणखी बदलते. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असते. गेल्या काही वर्षात वाहनाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून सर्वाधिक वापर केल्या जाणाऱ्यां रस्त्यावर ठिकठिकाणी वेळोवेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. भंडारा शहरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती चौकाचौकात करण्यात आली आहे. परंतु रस्त्यावरील अतिक्रमण व त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस पुढाकार घेत नाही.कच्चे, पक्के बांधकाम करुन अतिक्रमणठिकठिकाणी व्यावसायिक, दुकानदारांनी कच्चे, पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केल्याचे दिसून येते. दुकानांची शेड रस्त्यालगत आली आहेत. पादचाºयांना भर रस्त्यावरुनच चालावे लागते. रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे फुटपाथवर दुचाकी आणि चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत. फुटपाथवर वाहनधारकांनी कब्जा केल्यामुळे रिक्षाचालक रस्त्यावर रिक्षा उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन वाहतूक जाम होते.व्यवसायातील स्पर्धेमुळे अतिक्रमणआपल्या दुकानापेक्षा शेजाऱ्यांचे दुकान समोर आहे. त्यामुळे आपल्याकडे ग्राहक कमी येतील या भितीपोटी दुकानदार दुकानासमोर साहित्य ठेवतात आणि शेजाºयाची बरोबरी करतात. या स्पर्धेतून रस्त्यावर अतिक्रमण होते. त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. काही वेळा नगर पालिकाचे अतिक्रमण हटाव पथक कारवाई करते. कारवाई करुन पथक निघून गेले की पुन्हा दुकानदार पाहिल्यासारखेच दुकान थाटतात. जोपर्यंत दुकानदारांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत रस्त्यावरील अतिक्रमणे कमी होणार नाहीत, असे काही व्यवसायीकांचे मत आहे.अपघातात वाढरस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होवून अपघात होतात. नगर पालिका प्रशासनाने अतिक्रमणाकडे आणि वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष दिल्यास अपघात कमी होतील. नियमांची कठोर अंमलबजावणी केल्यास अतिक्रमणे कमी होती त्यामुळे वाहतुकीला अडचण होणार नाही. पण दोन्ही प्रशासनामधील अधिकारी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. फुटपाथ आणि रस्त्यावर दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहने उभे राहतात त्यामुळे पादचारी नागरिक रस्त्यावरुन ये-जा करतात.सिग्नल गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक वाढली की रात्री वाहनांची गर्दी होते. त्यामुळे अनेक वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो. वाहनांच्या आणि रस्त्यावरील अतिक्रमणाच्या गर्दीतून मार्ग काढताना अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता असते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा