शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अल्पवयीन मुलीला घरात डांबून पाच युवकांकडून दोन दिवस अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 18:20 IST

१८ दिवसांनंतर झाली तक्रार : पोक्सो अंतर्गत पाचही युवकांना अटक

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : आईवडील डान्स क्लास लावण्यास नकार देत असल्याने रागाने घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीला बसस्थानकावर गाठून फूस लावू नेले. नंतर तिच्यावर पाच जणांनी दोन दिवस सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण भंडारा शहरात पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पवन निखार (२५), हितेश निनावे (२६), करण खेताडे (२६), रॉनी कोटांगले (२८) आणि नितेश भोयर (३०) या पाचही युवकांना अटक केली आहे.  

ही घटना २७ जूनची असली तरी तक्रार मात्र १३ जुलैला झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात घरून निघून आलेली ही अल्पवयीन मुलगी भंडारा बस स्थानकावर बसून होती. दरम्यान, दोन तरुणांनी तिच्याजवळ येऊन विचारपूस केली. गप्पा मारायला सुरूवात केली. गप्पांच्या नादात तिला कोरंभी येथे फिरायला नेले. त्यानंतर या दोघांनी तिला त्यांच्या तिसऱ्या मित्राच्या घरी नेले. नंतर पुन्हा तेथे दोन मित्रांना बोलावून घेतले. हा प्रकार पाहून मुलीने त्यांना तिला बसस्थानकावर सोडून देण्याची विनंती केली. मात्र आरोपींनी तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. तिच्या नकारानंतरही त्यांनी बळजबरीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

रात्रभर सोबत घालविल्यावर दुसऱ्या दिवशी (२८ जून) सकाळी ७ वाजता दोन आरोपींनी तिला बस स्थानकावर परत सोडून दिले. ती तिथेच बसली असताना पुन्हा दोन आरोपी तिच्याकडे आले. जेवण कर, भूक लागली असेल, असे सांगून तिला मित्राच्या रूमवर नेले. जेवणानंतर दोघांनी पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी तिला बस स्थानकावर सोडून दिले. मात्र रात्री उशीर झाल्यामुळे तिने जिल्हा रुग्णालयात रात्र काढली.

गावी गेल्यावर तिने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर गुरूवारी तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पाचही जणांना अटक केली. १५ जुलैपर्यंत त्यांची पोलिस कोठडी घेण्यात आली असून या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उप निरीक्षक गौरी उईके यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणArrestअटकbhandara-acभंडारा