कमांडो ग्रुप गोपीवाडाकडून शिवराज्याभिषेक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:16+5:302021-06-09T04:43:16+5:30
शहापूर : कमांडो ग्रुप गोपीवाडा शहापूरतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती ...

कमांडो ग्रुप गोपीवाडाकडून शिवराज्याभिषेक दिन
शहापूर : कमांडो ग्रुप गोपीवाडा शहापूरतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी बल्याची पहाडी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी ६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा आयोजित केला जातो. दरवर्षी कमांडो ग्रुप गोपीवाडा शहापूर सदस्य महाराजांना मानाचा मुजरा देण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. हा सोहळा आता 'भगवा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी म्हणून हा निर्णय चंद्रशेखर डोळस यांनी घेतला आहे.
राज्याभिषेकाच्या दिवशी शिवरायांना 'शिवछत्रपती' होण्याचा सन्मान मिळाला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषाने बल्याची पहाडी दुमदुमून जातो. शिवरायांच्या भगव्याने वातावरण भगवामय होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी
प्रमुख पाहुणे म्हणून अमरदीप भुरे, मार्गदर्शक चंद्रशेखर डोळस, राजेंद्र सेलोकर, सामाजिक कार्यकर्ता आदेश कानतोडे, विपीन बोरकर,योगेश गाहाने, साहील राऊत, रितीक देवगडे देवानंद लांडगे, गायत्री नागरे,श्रेया शेंडे, गायत्री शेंडे, मुस्कान त्रिवेदी आदी कमांडो ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.