लाखांदूरच्या शिवाजी चौकातील खड्डे देतात अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:41+5:30
तालुक्याचे ठिकाण असलेल्या लाखांदूर येथील महत्वाचे चौक म्हणजे शिवाजी चौक आहे. या चौकातून साकोली, अर्जुनी, वडसा, भंडारा, पवनी आदी शहराला जाण्यासाठी मार्ग आहेत. या ठिकाणी एसटी बस, खाजगी प्रवाशी वाहतूकचा याच ठिकाणी थांबा आहे. त्यामुळे शाळकरी मुले, ये-जा करणारे प्रवाशांची याच ठिकाणी नेहमी वर्दळ असते.

लाखांदूरच्या शिवाजी चौकातील खड्डे देतात अपघाताला आमंत्रण
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : येथील साकोली -लाखांदूर - वडसा महामार्गावरील शिवाजी चौक टी-पाइन्ट येथे अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर याच चौकातून प्रवाशांची व वाहनांची वर्दळ असते. मात्र याकडे संबंधीत विभाग दुर्लक्ष करीत असल्याने अपघात होत आहेत. अधिकारी दुर्लक्ष करून वेळ मारून नेत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे त्वरित लक्ष वेधून डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे
तालुक्याचे ठिकाण असलेल्या लाखांदूर येथील महत्वाचे चौक म्हणजे शिवाजी चौक आहे. या चौकातून साकोली, अर्जुनी, वडसा, भंडारा, पवनी आदी शहराला जाण्यासाठी मार्ग आहेत. या ठिकाणी एसटी बस, खाजगी प्रवाशी वाहतूकचा याच ठिकाणी थांबा आहे. त्यामुळे शाळकरी मुले, ये-जा करणारे प्रवाशांची याच ठिकाणी नेहमी वर्दळ असते. या ठिकाणी गाड्या थांबविण्यासाठी जागा अपुरी असल्याने मुख्य डांबरीकरण मार्गावरच बस थांबवतात. त्यामुळे खाजगी वाहतुकीला अडचण निर्माण होत असतो. या टी-पाइन्टवर दोन बाजूला खूप मोठंमोठे खड्डे पडले असल्याने बस, खाजगी प्रवाशी वाहतूक फिरवितांना खूप अडचण निर्माण होतो. सदर गाड्या अनियंत्रीत होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नागरिक व जनप्रतिनिधी यांनी तक्रारी करून संबंधित विभागाला अवगत केले. मात्र सदर मार्ग हा महामार्ग विकास महामंडळला वळती झाला असून त्यांचे कार्यालय नागपूर येथे असल्याने त्यांच्या पर्यंत गाºहाणी मांडायला जायचे कसे, असा प्रश्न जनतेसमोर उभा ठाकला आहे. सदर चौकातील खड्ड्यांची डागडुजी कोण करणार व जनतेला होणारा त्रास कमी होणार की नाही, असे विविध प्रश्न निर्माण झाले आहे. खड्ड्यांची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी जनतेनी केली आहे.