अधिकाऱ्यांची निवासस्थाने भिक्षेकऱ्यांचे आश्रयस्थान !
By Admin | Updated: December 2, 2014 23:01 IST2014-12-02T23:01:14+5:302014-12-02T23:01:14+5:30
तालुक्यातील अधिकाऱ्यांची निवासस्थाने सध्या भिकाऱ्यांची निवासस्थान झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे निवासस्थान पूर्णपणे जिर्ण झाली. परिणामी उपविभागीय पोलिस अधिकारी व वनविभागाचे

अधिकाऱ्यांची निवासस्थाने भिक्षेकऱ्यांचे आश्रयस्थान !
संजय साठवणे - साकोली
तालुक्यातील अधिकाऱ्यांची निवासस्थाने सध्या भिकाऱ्यांची निवासस्थान झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे निवासस्थान पूर्णपणे जिर्ण झाली. परिणामी उपविभागीय पोलिस अधिकारी व वनविभागाचे अधिकारी वगळता सर्वच अधिकारी भाड्याच्या घरात राहतात.
साकोली तहसील कार्यालयाची इमारत ही एकेकाळी इंग्रजांचे मुख्यालय होते. इंग्रजांच्या काळापासून तालुका अस्तीत्वात आहे. अशा ऐतीहासिक तालुक्यातील अधिकारीच आज भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या निवासस्थानी सध्या भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. ही या तालुक्यासाठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.
सद्यास्थितीत तहसिलदारांच्या निवासस्थानात निवडणूक विभागाचे कार्यालय आहे. तर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थान जीर्ण अवस्थेत पडले आहे. लाखांदूर रोडवरील खंडविकास अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला दोन वर्षापूर्वी आग लागली होती.
या निवासस्थानाची नंतर दुरुस्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे सध्या हे ठिकाण मुत्रीघर आहेच शिवाय येथे वेडे व भिकारी आश्रयाला असतात. तर पोलिस निरीक्षकांचे निवासस्थानही तसेच खाली पडून आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांचे निवासस्थानही पुर्णपणे खचलेले व पडलेले आहे. त्यामुळे तेही याठिकाणी राहत नसल्याने परिसरातील दुकानदार याचा उपयोग मुत्रीघरांसाठी करतात.