दहाजणांनी अतिप्रसंग केल्याने 'ती' बनली कुमारी माता; सगळ्यांची केली डीएनए टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 07:00 IST2021-10-27T07:00:00+5:302021-10-27T07:00:01+5:30

Bhandara News जवाहरनगर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका गावात १७ वर्षीय मुलीवर काही नराधमांनी अतिप्रसंग केला. यानंतर या अल्पवयीन कुमारिकेने रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला.

'She' became a virgin mother when ten people had an affair; Everyone's DNA test | दहाजणांनी अतिप्रसंग केल्याने 'ती' बनली कुमारी माता; सगळ्यांची केली डीएनए टेस्ट

दहाजणांनी अतिप्रसंग केल्याने 'ती' बनली कुमारी माता; सगळ्यांची केली डीएनए टेस्ट

ठळक मुद्देदिला गोंडस मुलीला जन्म




भंडारा : जवाहरनगर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका गावात १७ वर्षीय मुलीवर काही नराधमांनी अतिप्रसंग केला. यानंतर या अल्पवयीन कुमारिकेने रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी १८ वर्षांवरील एकूण १० जणांवर पोक्सो कायद्याअंतर्गत अटक केली आहे.

माहितीनुसार, वर्षभरापासून या पीडित मुलीवर अनेकांनी अतिप्रसंग केला. यातूनच तिला गर्भधारणा झाली. मात्र भीतीपोटी तिने याची वाच्यता केली नाही. दरम्यान, तिला वेदना सुरू झाल्याने तिला भंडाऱ्यात दाखल करण्यात आले. यावेळी तिच्यावर अत्याचार होऊन ती गर्भवती असल्याचे समोर आले. याप्रसंगी पोलिसांना पाचारण करून तिची जबानी नोंदविण्यात आली.

तक्रारीवरून पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. यापैकी ७ जणांची डीएनए तपासणी केली, तसेच उर्वरित तीन जणांची मंगळवारी डीएनए तपासणी करण्यात आली. तपास प्रभारी पोलीस उपअधीक्षक रिना जनबंधू करीत आहेत. या प्रकरणात अजून काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती असून पोलीस तपास सुरू असल्याने आरोपींची नावे देण्यास पोलीस प्रशासनाने नकार दिला.

Web Title: 'She' became a virgin mother when ten people had an affair; Everyone's DNA test