Severe accident in Bhandara district; Vehicles under the truck | भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रकखाली दबली वाहने
भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रकखाली दबली वाहने

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: मँगेनीजची वाहतूक करणारा एक ट्रक ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित होऊन उलटला व त्याखाली अन्य गाड्या व नागरिक दबल्याची घटना राजापूर-नाकाडोंगरी मार्गावर गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घडली.

तुमसर तालुक्यातील बाळापूर शिवारात मॅग्नीजची माती मिश्रीत माती वाहून नेणारा अठरा चाकी ट्रेलर रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या दुचाकींवर उलटला. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी ट्रेलरचालकाला किरकोळ दुखापत झाली. ही घटना गुरूवारी दुपारी २.२५ वाजताच्या सुमारास घडली.  चालक मद्य प्राशन केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. वृत्त लिहिपर्यंत मातीच्या ढिगाऱ्यातून सहा दुचाकी बाहेर काढण्यात आल्या होत्या

Web Title: Severe accident in Bhandara district; Vehicles under the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.