भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रकखाली दबली वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 15:38 IST2019-12-12T14:45:18+5:302019-12-12T15:38:37+5:30
मँगेनीजची वाहतूक करणारा एक ट्रक ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित होऊन उलटला व त्याखाली अन्य गाड्या व नागरिक दबल्याची घटना राजापूर-नाकाडोंगरी मार्गावर गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घडली आहे.

भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रकखाली दबली वाहने
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: मँगेनीजची वाहतूक करणारा एक ट्रक ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित होऊन उलटला व त्याखाली अन्य गाड्या व नागरिक दबल्याची घटना राजापूर-नाकाडोंगरी मार्गावर गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घडली.
तुमसर तालुक्यातील बाळापूर शिवारात मॅग्नीजची माती मिश्रीत माती वाहून नेणारा अठरा चाकी ट्रेलर रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या दुचाकींवर उलटला. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी ट्रेलरचालकाला किरकोळ दुखापत झाली. ही घटना गुरूवारी दुपारी २.२५ वाजताच्या सुमारास घडली. चालक मद्य प्राशन केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. वृत्त लिहिपर्यंत मातीच्या ढिगाऱ्यातून सहा दुचाकी बाहेर काढण्यात आल्या होत्या