वैनगंगेच्या रोहा घाटावर सात रेती तस्करांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:49 IST2019-04-26T00:48:13+5:302019-04-26T00:49:40+5:30
तालुक्यातील वैनगंगा नदीच्या रोहा घाटावर अवैध साठवून ठेवलेल्या रेतीची वाहतूक करणाऱ्या सात तस्करांना जिल्हा खनीकर्म विभाग व पोलिसांच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्यांच्या जवळून १२ लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वैनगंगेच्या रोहा घाटावर सात रेती तस्करांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यातील वैनगंगा नदीच्या रोहा घाटावर अवैध साठवून ठेवलेल्या रेतीची वाहतूक करणाऱ्या सात तस्करांना जिल्हा खनीकर्म विभाग व पोलिसांच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्यांच्या जवळून १२ लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बहुतांश ट्रक चालक अमरावती जिल्ह्यातील असल्याचे कारवाईत दिसून आले.
भंडारा जिल्ह्यात रेती तस्करीला अलिकडे मोठे उधाण आले आहे. प्रत्येक घाटावर रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे. अशातच मोहाडी तालुक्यातील रोहा येथील वैनगंगा नदीघाटावर जिल्हा खनीकर्म अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाने धाड मारली. त्यावेळी वैनगंगा नदीतील रेती चोरून स्मशानभूमीजवळ साठा केल्याचे दिसून आले. या साठ्यातील रेती जेसीबीच्या सहाय्याने ट्रकमध्ये भरली जात होती. या कारवाईत शाहाजाद सुलतान खान (३७) रा.वली चौक अमरावती, कलीम नसीम खान (४८) रा.पठाण चौक अमरावती, उज्ज्वल सदाशिव मेश्राम (४०) रा.बडनेरा (अमरावती), अशफाक मिसार शेख (२५) रा.मुजफ्फर पुरा अमरावती, फारूक हसन सैय्यद (२९) नवसारी (अमरावती), फारुख सत्तार खान (२२) रा.गणेशगंज जिल्हा शिवणी या ट्रकचालकांसह जेसीबीचालक प्रशांत कुंडलीक पटले (२३) रा.घोटमुंढरी जि.नागपूर यांना ताब्यात घेतले.
त्यांच्या जवळून २४५ ब्रास रेती किंमत ७ लाख ३५ हजार रुपये जप्त करण्यात आली. सदर वाहने भंडारा पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आली आहेत. ही कारवाई जिल्हा खनीकर्म अधिकाऱ्यांचे पथक, राखीव पोलीस दल, मोहाडी तहसीलचे भरारी पथक, मोहाडीचे ठाणेदार शिवाजी कदम, पोलीस शिपाई विनोद सेलोकर, पवन राऊत, मिताराम मेश्राम यांनी केली.
मुंढरी घाटावर तस्करी जोमात
वैनगंगा नदीच्या अलिकडच्या तिरावर रोहा घाट तर पैलतिरावर मुंढरी घाट आहे. विशेष म्हणजे पैलतिरावरील भागात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे करून ठेवले आहेत. शेकडो ब्रास रेती शेतामध्ये आहे. यात डंपींग केलेल्या रेतीची रात्रीच्या वेळी वाहतूक केली जाते. नागपूरसह विदर्भात ही रेती पाठविली जात आहे. या घाटावर अद्यापर्यंत कुणीही कारवाई केली नाही. तस्करी करणाºया वाहनांच्या दररोज रांगा दिसत आहे. अशीच अवस्था कन्हाळगाव व ढिवरवाडा घाटावरही आहे.