सात मुलींचे आयुष्य ‘स्माईल’ने फुलले

By Admin | Updated: February 13, 2016 00:18 IST2016-02-13T00:18:46+5:302016-02-13T00:18:46+5:30

रलोभनातून घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. आईवडिलांपासून दूरावलेल्या मुलींना स्थानिक गुन्हे शाखेच्या ‘आॅपरेशन स्माईल दोन’ च्या पथकाने शोधून काढून ...

Seven girls' life 'Smile' blossomed | सात मुलींचे आयुष्य ‘स्माईल’ने फुलले

सात मुलींचे आयुष्य ‘स्माईल’ने फुलले

बेपत्ता मुलींचा शोध : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश
भंडारा : प्रलोभनातून घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. आईवडिलांपासून दूरावलेल्या मुलींना स्थानिक गुन्हे शाखेच्या ‘आॅपरेशन स्माईल दोन’ च्या पथकाने शोधून काढून आईवडीलांच्या सुपुर्द केले. यामुळे बेपत्ता असलेल्या मुलींना आईवडीलांचे छत्र मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकु लागले आहे.
समाजातील गरीब प्रवर्गातील अनेक मुला-मुलींना प्रलोभन देवून त्यांना पळवून नेण्याचा किंवा अपहरणाचा प्रकार मागील काही दिवसांपासून वाढला आहे. यामुळे अनेकांची मुले बेपत्ता झाली. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विभागाने आॅपरेशन मुस्कान राबविले होते. जुलै महिन्यात या मोहिमेत एक मुलगा व एक मुलगी शोधून काढण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर १ ते ३१ जानेवारीपर्यंत आॅपरेशन स्माईल दोन ही मोहिम राबविण्यात आली.
यात सात मुलींना शोधण्यात पथकाला यश आले. सातही मुलींना त्यांच्या आईवडीलांच्या सुपूर्द करण्यात आले आहे. ही मोहिम पोलीस अधिक्षक विनीता साहू, अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर, जिल्ह्यातील सर्व ठाणेदार व विशेष पथकाने राबविली. (शहर प्रतिनिधी)

मुलांचे शारीरिक शोषण
अपहरण केल्यानंतर या मुलांना मोठ्या शहरात विकण्यात येते. त्याठिकाणी त्यांचा वापर भीक मागण्यासाठी करण्यात येतो. वेळप्रसंगी त्यांचे शारीरिक शोषण करून वाममार्गाकडे वळविले जाते. तर मुलींकडून देह व्यापार करण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येतो.
शोधकार्यासाठी पथक
शोध मोहिमसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामधून एक अधिकारी व दोन कर्मचारी नेमण्यात आले. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानक, रूग्णालय, उद्यान, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणी भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क साधला.

Web Title: Seven girls' life 'Smile' blossomed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.