कारधा येथे सात जुगाऱ्यांना रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:42 IST2021-09-07T04:42:30+5:302021-09-07T04:42:30+5:30

पिंटू ऊर्फ लक्ष्मण शामराव भुरे (वय २१, रा. कारधा), दानिश अखिल खान (२६, रा. कारधा), आशिष परसराम निंबार्ते (३२, ...

Seven gamblers were caught red-handed at Kardha | कारधा येथे सात जुगाऱ्यांना रंगेहात पकडले

कारधा येथे सात जुगाऱ्यांना रंगेहात पकडले

पिंटू ऊर्फ लक्ष्मण शामराव भुरे (वय २१, रा. कारधा), दानिश अखिल खान (२६, रा. कारधा), आशिष परसराम निंबार्ते (३२, रा. सालेबर्डी), राजू नीलकंठ खंगार (२१, रा. आंबेडकर वाॅर्ड भंडारा), नीलेश प्रकाश किटे (४०, रा. साईनाथ नगर भंडारा), भगवान आत्माराम खंगार (३१, रा. कारधा, साेमेश्वर) ईस्तारी दुनाडे (२१, रा. कारधा) अशी जुगाऱ्यांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारधा येथे कटपत्तीचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. हा जुगार अनमाेल पतीराम बाेंद्रे (२९, रा. सिरसघाट) हा भरवीत हाेता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धापा टाकला असता काही जुगारी पसार झाले. मात्र, सात जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात एएसआय मडामे, पीएसआय रवींद्र रेवतकर, जमादार माेहरकर, पाेलीस नायक दाेनाेडे, पुराम, रामटेके, देशमुख यांनी केली.

Web Title: Seven gamblers were caught red-handed at Kardha