शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

नोकर जेरबंद, ४२९ टायर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:49 IST

गोदामातून टायर चोरणाऱ्या नोकरासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अवघ्या २४ तासात जळगाव जिल्ह्याच्या वरणगाव येथून जेरबंद केले. त्याच्याजवळून ४२९ टायरसह ट्रक जप्त करण्यात आला. सोमवारच्या रात्री नोकराने भंडारा येथील सहकार नगरातील जिंदल कॉम्प्लेक्समधील गोदामातून टायर चोरले होते.

ठळक मुद्देगोदामातील चोरीचे प्रकरण : जळगाव जिल्ह्याच्या वरणगावमधून दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोदामातून टायर चोरणाऱ्या नोकरासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अवघ्या २४ तासात जळगाव जिल्ह्याच्या वरणगाव येथून जेरबंद केले. त्याच्याजवळून ४२९ टायरसह ट्रक जप्त करण्यात आला. सोमवारच्या रात्री नोकराने भंडारा येथील सहकार नगरातील जिंदल कॉम्प्लेक्समधील गोदामातून टायर चोरले होते.शुभम अशोक तायडे (२१) रा.आहुजा नगर जळगाव हल्ली मुक्काम जवाहरनगर (भंडारा) आणि संभाजी पंडीत पाटील (५१) रा.मनुदेवी सोसायटी आहुजा नगर जळगाव असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. साकोली येथील अरुण गंगासागर गुप्ता यांचे सहकार नगरातील जिंदल कॉम्प्लेक्समध्ये टायरचे गोदाम आहे. त्यांच्याकडे शुभम हा गत वर्षभरापासून नोकरीवर होता. दरम्यान अरुण गुप्ता तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून परत आल्यानंतर मंगळवारी आपले गोदाम उघडले असता गोदामातील सुमारे ५०० टायर लंपास झाल्याचे लक्षात आले. या प्रकाराने घाबरलेल्या गुप्ता यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.गोदामातून एकाच वेळी पाचशेच्या आसपास टायर लंपास झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. वेगवेगळ्या दिशेने तपास सुरु केला. घटनास्थळी भेट दिली असता सिसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे दिसून आले. एक दिवसापूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे नोकराने बंद केल्याचे पुढे आले. त्यावरून शुभम तायडेवर संशय बळावला. त्यातच तो कामावरही हजर नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो स्वीच आॅफ येत होता. ऐवढेच नाही तर पोलिसांनी तो राहत असलेल्या जवाहरनगर येथे जाऊन नातेवाईकांची विचारपूस केली. त्यामुळे शुभमवर पोलिसांचा संशय बळावला.पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथक तयार केले. तसेच शुभमच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून अकोला, बुलढाणा आणि जळगाव पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. तसेच येथून दोन पथक त्यांच्या मागावर निघाले. दरम्यान बुधवारी जळगाव जिल्ह्यातील वरणगाव बसस्थानक परिसरात हे दोघे ट्रक घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ट्रक ताब्यात घेण्यात आला.शुभम व त्याचा साथीदार संभाजी या दोघांना अटक करून भंडारा येथे आणण्यात आले. त्यांनी ४२९ टायर चोरल्याचे लक्षात आले. सर्व टायर जप्त करण्यात आले असून या टायरची किंमत १७ लाख रुपये आहे. तसेच सात लाखांचा ट्रकही जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख रवींद्र मानकर, ठाणेदार सुधाकर चव्हाण यांनी केली. आरोपींच्या शोधात पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे, प्रशांत गुजर, पुरुषोत्तम शेंडे, अतुल मेश्राम, बापूूराव भुसावळे, अजय कुकडे, कृष्णा कातखेडे, संदीप बन्सोड, साजन वाघमारे यांचे पथक गेले होते. अवघ्या २४ तासात पोलिसांनी या चोरीचा छडा लावला.चोरट्याला टाकायचे होते दुकानवर्षभरापासून अरुण गुप्ता यांच्याकडे नोकर असलेल्या शुभम याला पोलिसांनी अटक केली. चोरी करण्यामागे कारण विचारले असता त्याने आपल्याला टायरचे दुकान टाकायचे होते. त्यासाठीच आपण चोरी केल्याचे पोलिसांपुढे कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी शहर ठाण्यात आयोजित पत्रपरिषदेत दिली. शुभमने अवघ्या एक ते दोन तासात हमालांच्या मदतीने ट्रकमध्ये टायर भरले. गुप्ता यांचा शुभम नोकर असल्याने परिसरातील कुणालाही ट्रकमध्ये टायर भरताना संशय आला नाही. मात्र मालक दर्शनावरून परत आल्यानंतर चोरीचे बिंग फुटले. दुकानाऐवजी आता शुभमला कारागृहाची हवा खावी लागणार आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस