मारहाणीत एक गंभीर
By Admin | Updated: April 14, 2016 00:30 IST2016-04-14T00:30:14+5:302016-04-14T00:30:14+5:30
स्थानिक जवाहर गेटसमोर मिनी बस स्थानकावर दोन भिन्न ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी भरण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात

मारहाणीत एक गंभीर
गुन्हा दाखल : प्रवासी भरण्यावरून वाद
पवनी : स्थानिक जवाहर गेटसमोर मिनी बस स्थानकावर दोन भिन्न ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी भरण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात होवून लाठीने मारहाण केल्यामुळे एक जण गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी झाला. जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे आरोपीविरूद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
रविवार दि. १० ला सायंकाळी ७.१५ वाजताचे दरम्यान नागपूर वरून आलेल्या दोन ट्रॅव्हल्स एक बारव्हा व दुसरी पालांदूरला जाण्यासाठी जवाहर गेट समोरील मिनी बस स्थानकाजवळ थांबलेल्या होत्या. एकाच मार्गावर ट्रॅव्हल्स जाणार असल्याने प्रथम कोणती गाडी भरावी यावरून वाद विवाद सुरू झाला. वादाचे रूपांतर थोड्याच वेळात मारहाणीत झाले. मारहाणीत गंभीर जखमी झालेला देवा उर्फ देवानंद हरिदास राऊत वय ३६ वर्षे रा. बेलघाटा वॉर्ड पवनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून या ता ट्रॅव्हल्सचा मालक मोहम्मद काशिम शफी शेख (५०), त्यांचा जावई सनाऊल मुरूकहू ददा शेख (३२), साईना उर्फ सर्वरा सर्व रा. पवनी व इतर चौघांनी लाठीकाठीने त्यास जबर मारहाण केली. सोबतच जातीवाचक शिवीगाळ केली तसेच देवा सोबत असलेल्या रमेश उराडे यास देखील मारहाण केली. तक्रारीवरून पवनी पोलिसांनी अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल केला. रात्री २ वाजता मोहम्मद काशिम शफी शेख (५०) व त्यांचा जावई सनाऊल शेख (३२) यांना अटक करण्यात आली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत सांगोळे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी )