महिला संरक्षण कायद्यावर चर्चासत्र

By Admin | Updated: January 19, 2016 00:26 IST2016-01-19T00:26:39+5:302016-01-19T00:26:39+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त पवनी येथील डॉ. एल. डी. बलखंडे कॉलेज आॅफ अ‍ॅन्ड कॉमर्स येथे राज्यशास्त्र आणि ...

Seminar on Women Protection Act | महिला संरक्षण कायद्यावर चर्चासत्र

महिला संरक्षण कायद्यावर चर्चासत्र

पवनी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त पवनी येथील डॉ. एल. डी. बलखंडे कॉलेज आॅफ अ‍ॅन्ड कॉमर्स येथे राज्यशास्त्र आणि ग्रंथालय विभागद्वारे एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. साधना येरणे, संस्थापक डॉ. मिलिंद येरणे उपस्थित होते. त्यांनी महिला संरक्षण कायदयावर विचार व्यक्त करताना समाजात होणाऱ्या हिंसेपासून महिलांना संरक्षण देणे गरजेचे आहे. घरेलू हिंसेपासून महिला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
तसेच महिलांनीसुध्दा महिला सुरक्षितता कायद्यााची जाणीव करुन घेणे आवश्यक आहे. अशाप्रकारे पोटगीचा कायदा घटस्फोट, बालविवाह, लैंगिक शोषण कायदा, हिंदु विवाह कायदा, स्त्री भ्रूण हत्या, हुंडा प्रतिबंधक आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रेखा वानखेडे, स्त्रियांना मूलभूत अधिकार घटनेने बहाल केलेला आहे. त्याची जोपासना करावी, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. जयकिशन संतोषी व प्रमुख अतिथी म्हणून प्रा. शीला कापसे, रासेयो अधिकारी प्रा. एन. पी. सिंगाडे उपस्थित होते.
तसेच राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये गिरीश रामटेके, कवडू कटारे वाहतूक पोलीस पवनी यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना पथनाट्याद्वारे सादरीकरण केले. प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. स्वाती शंभरकर यांनी तर संचालन प्रा. एन. पी. सिंगाडे, आभार प्रा. आरती बावनथडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. डि. सी. शिंदे, प्रा. मंगेश वाहणे, प्रा. जाधव, प्रा. गजभिये, गुरुदत्त मेश्राम तसेच एन. एस.एस. विद्यार्थी श्रेया खापर्डे, योगेश पचारे, कोमल काटेखाये आदी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. याप्रसंगी महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Seminar on Women Protection Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.