गॅस सिलिंडरच्या भडक्यात घर बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:47+5:30

कैलास किसन देशमुख यांचे निलज येथे घर आहे. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यामुळे त्यांनी घरालगतच एका कौलारू घरात तात्पुरता आश्रय घेतला आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वयंपाकानंतर त्यांची पत्नी रेग्युलेटरचा स्वीच बंद करण्यासाठी गेल्या.

Sell the house in a gas cylinder flare | गॅस सिलिंडरच्या भडक्यात घर बेचिराख

गॅस सिलिंडरच्या भडक्यात घर बेचिराख

ठळक मुद्देनिलजची घटना : रोखेसह साहित्य भस्मसात

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गॅस सिलिंडरच्या भडक्याने घराला आग लागून संपूर्ण घर बेचिराख झाल्याची घटना पवनी तालुक्यातील निलज येथे बलिप्रतिपदेच्या दिवशी सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या आगीत एक लाख रूपये रोख आणि घरातील कपडेलत्ते व साहित्य जळून भस्मसात झाले.
कैलास किसन देशमुख यांचे निलज येथे घर आहे. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यामुळे त्यांनी घरालगतच एका कौलारू घरात तात्पुरता आश्रय घेतला आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वयंपाकानंतर त्यांची पत्नी रेग्युलेटरचा स्वीच बंद करण्यासाठी गेल्या. परंतु स्वीच बंद होत नव्हता. त्यातच गॅस गळती होवून भडका झाला. आग विझविण्यासाठी शिक्षक कैलास देशमुख धावून गेले. त्यांचे दोनही हात किरकोळ स्वरूपात भाजले. आग आटोक्यात आली नाही. उलट संपूर्ण घर या आगीने कवेत घेतले. गावकऱ्यांनी लगतच्या बोरवेलवरील मोटारपंप सुरू करून पाण्याचा मारा केला. त्यामुळे आग आटोक्यात आली. परंतु तोपर्यंत घरातले सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
बांधकाम मंजुरीसाठी रोख एक लाख रूपये देशमुख यांनी घरी ठेवले होते. ते या आगीत जळून भस्मसात झाले. तसेच दिवाळीनिमित्त खरेदी केलेले संपूर्ण साहित्य, कपडे, धान्य जळाले आहे. यात त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

नुकसानभरपाईची मागणी
दिवाळीच्या काळात घर बेचिराख झाल्याने कैलाश देशमुख यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करुन मदत देण्याची मागणी होत आहे. तसेच संबंधित गॅस एजन्सीनेही सिलेंडरचा स्वीच का बंद होत नव्हता, याची चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे.

Web Title: Sell the house in a gas cylinder flare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात