स्वयंअर्थसहाय्यित शाळांचे पीक वाढणार
By Admin | Updated: June 25, 2014 00:15 IST2014-06-25T00:15:02+5:302014-06-25T00:15:02+5:30
आधिच विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची होणारी धावपळ, वर्ग तुकड्यांची तुटातुट कारणामुळे होणारे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न उभा ठाकला असताना आता शासनाने स्वयंअर्थसहाय्यित नवीन शाळांना परवानगी

स्वयंअर्थसहाय्यित शाळांचे पीक वाढणार
मोहाडी : आधिच विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची होणारी धावपळ, वर्ग तुकड्यांची तुटातुट कारणामुळे होणारे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न उभा ठाकला असताना आता शासनाने स्वयंअर्थसहाय्यित नवीन शाळांना परवानगी देण्यासाठी संस्थाना अर्ज मागविले आहेत.
खाजगी शाळांचे जाळे खूप वाढले आहे. यातून अनेक प्रश्न उभे झाले आहेत. मराठी शाळांतर अवसानात निघण्याच्या तयारीत आहेत. दरवर्षी आपल्या शाळेची वर्गतुकडी शाबूत राहावी यासाठी शिक्षण माथापच्छी करीत असतात. यातूनही मार्ग सापडत नाही. मग, शिक्षक सामाजिक मूल्य बाजूला सारून विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी नाही ते करतात, असे होवूनही इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृतीच्या बोझ्याखाली मराठी शाळेचे शिक्षक हतबल होत आहेत. दरवर्षी मराठी शाळा मोडकळीस येताहेत. शिक्षकांना अतिरिक्त व्हावे लागत आहे. शासनापुढे शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न पुढे येत आहे. याच प्रश्नामुळे दीड दोन वर्ष शिक्षक भरतीवर बंदी आली होती. आता संस्थाना वारेमाप पैसा लुटण्यासाठी शासनाने स्वयंअर्थसहाय्यित नवीन शाळा सुरू करण्यासाठी अर्ज मागविले आहेत. प्राथमिक, प्राथमिक ते उच्च प्राथमिक, प्राथमिक ते माध्यमिक व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळा तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक व माध्यमिक ते उच्च माध्यमिक शाळेचा प्रकार पाडण्यात आला आहे. शासनाने यापूर्वी कायम विना अनुदान तत्वावर शाळा दिला होत्या. आता शाळा अनुदानावर येणार आहेत. आता स्वयंअर्थसहाय्यित नवीन शाळा देण्यापुढे मोठ्या प्रमाणात नवीन शाळांचे पीक वाढणार आहेत. यात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहणार आहे.
सोबतच शासनाने उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचा दर्जावाढ करण्यासाठी अर्ज मागितले आहेत. नवीन शाळा मान्यतेकरीता व अस्तित्वात असलेल्या शाळांचा दर्जा वाढ करण्यासाठी संस्थाना संकेत स्थळावर अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरायचा आहे. त्यासाठी अर्जासोबत कागदपत्रांच्या व पाच हजार रूपये शासकीय कोषागार जमा केलेल्या चलणाची प्रत अर्जासोबत संकेत स्थळावर अपलोड करायची आहे. स्वयंअर्थसहाय्यीत शाळा उघडण्यासाठी संस्थानी २० जुलै पर्यंत अर्ज शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक कार्यालयास सादर करायचे आहे. स्वय अर्थसहाय्यीत शाळांचा लोंढा गावा गावात दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे विद्यार्थी प्रवेशासाठी मोठा संघर्ष शिक्षकांना करावा लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)