थकबाकीधारकांवर जप्तीची कारवाई
By Admin | Updated: March 2, 2015 00:58 IST2015-03-02T00:58:04+5:302015-03-02T00:58:04+5:30
गावागावांत लक्षावधी रुपयांची थकबाकी गावकऱ्यांवर आहे. यामुळे प्रशासकीय कामे तथा विकास कामे प्रभावित होत आहेत.

थकबाकीधारकांवर जप्तीची कारवाई
चुल्हाड (सिहोरा) : गावागावांत लक्षावधी रुपयांची थकबाकी गावकऱ्यांवर आहे. यामुळे प्रशासकीय कामे तथा विकास कामे प्रभावित होत आहेत. या थकबाकीच्या वसुली करिता जप्तीची कारवाई सुरु झाली असून डोंगरला गावात पथकांने थकबाकी धारकांचे साहित्य जप्त केली आहे.
अंदाजे दोन हजार लोकवस्ती असलेल्या तुमसर, बपेरा, राज्य मार्गावरील डोंगरला गावात नागरिकांवर ग्राम पंचायत मार्फत करांची आकारणी करण्यात आली आहे. यात घर कर, पानी पट्टी कर, दिवाबत्ती तथा अन्य करांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षापासून गावकऱ्यांवर थकबाकी असल्याने निधीचा वाढता आकडा आहे. ग्राम पंचायतचे दस्तऐवजात ही आकडा लक्षावधीच्या घरात गेला आहे. ३ लाख ३९ हजार ४२७ रुपये थकबाकी असल्याने गावातील विकास कामे प्रकावित झाले आहे. या थकीत करात पानी पट्टी करांचा समावेश आहे. नियोजीत वेळेवर थकीत घरांचा भरणा गावकरी करित नसल्याने नळ योजना अडचणीत येत आहेत. या शिवाय प्रशासकीय कामे प्रभावित ठरत आहेत. ज्या गावाची १०० टक्के वसुली पुर्ण होत नाही. अशा गावांना अनुदान राशी वाटप करतांना तारेवरची कसरत अधिनस्थ यत्रंणेला घराची लागत आहे.
गावकरी थकीत भरणा करित नाहीत. या उलट सुविधा मागतांना ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करतात. यामुळे यात राजकारण होत आहे. यामुळे डोंगरला गावात गावकऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. या गावातुन शखनांद पथकाने सुरुवात केली आहे. गावात दोन ते पाच हजार पर्यंत थकबाकी दारात बडे आसामी आहेत.
या शिवाय अनेक वर्षापासून थकीत कर आहे, असे थकबाकी दारावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत गुंड, पंखे, सिलाई मशीन, सोफा तथा अन्य वस्तु जप्त करण्यात आलेल्या आहेत. या कारवाईमुळे पथकाने गावात ८० टक्के कर वसुली केली आहे. अन्य गावात पॅटर्न राबविण्यात येणार आहे. या कारवाईच्या धास्तीने बडे आसामीचे धाबे दणाणले आहेत. जप्तीच्या कारवाईची विचारणा सातत्याने करण्यात येत आहे. या पथकात अन्य गावातील ग्रामसेवक असल्याने स्थानिक ग्रामसेवक हस्तक्षेप करित नाही.
यामुळे कारवाईत पक्षपाताची भूमिका येत नाही. दरम्यान कारवाई करतांना कुणाचीही गय केली जाणार नाही. असे निर्देश पथकाला देण्यात आले आहे. (वार्ताहर)वाता