शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

शाळा महाविद्यालयाला सील

By admin | Updated: March 3, 2016 00:42 IST

तुमसर नगरपरिषदेने थकीत करवसुली मोहीम सुरु केली आहे. त्याचा फटका बुधवारी शाळेसह एका महाविद्यालयाला बसला. दोन्ही शैक्षणिक संस्था बुधवारी पालिकेने सील केले.

तुमसर नगरपरिषदेची कारवाई : प्रकरण थकीत कराचे, गुरुवारपासून प्रात्यक्षिक परीक्षा, आंदोलनाची शक्यतातुमसर : तुमसर नगरपरिषदेने थकीत करवसुली मोहीम सुरु केली आहे. त्याचा फटका बुधवारी शाळेसह एका महाविद्यालयाला बसला. दोन्ही शैक्षणिक संस्था बुधवारी पालिकेने सील केले. गुरुवारपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होत आहेत. शैक्षणिक संस्थेवर प्रथमच कारवाई करण्यात आली, हे विशेष.तुमसर शहरात थकीत कराचे अनेक प्रकरणे आहेत. करवसुली नाही तर विकासात्मक कामांना अनुदान नाही असा पवित्रा शासनाने घेतला आहे. नगरपरिषदेची आर्थिक गाडी रूळावर आणण्यासाठी मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने यांनी पुढाकार घेतला आहे. शहरात सध्या थकीत कर अभियानाचा धडाका सुरु आहे. बुधवारी दुपारी मुख्याधिकारी गुल्हाने कर वसुली पथकाचे वरिष्ठ निरीक्षक वहीद खान व पथकाचे सदस्य शहरातील श्रीराम नगरात तुमसर सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या गोदाम परिसरात दाखल झाले. प्रथम त्यांनी गोदाम सील केले. नंतर संस्थेच्या इमारतीत साई कला, वाणिज्य महाविद्यालय भाड्याने आहे. त्या इमारतीला पथकाने सिल केले. या संस्थेकडे पालिकेचे ७७,६२८ रुपये थकीत आहे. महाविद्यालयाचे संचालक किशोर चौधरी यांनी या कारवाईस विरोध केला. परंतु पथकाने सील ठोकले. गुरुवारपासून विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होत असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. गौतमनगरात विशाल विद्यालय सुरु आहे. या शाळेवर सन २००५ पासून आतापर्यंत १२.५२ लाख रूपयांचे कर थकीत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या शाळेला बुधवारी सील ठोकले. या शाळेतही विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. शाळा महाविद्यालयावर नगरपरिषद प्रशासनाने प्रथमच कारवाई केली. जिथे शाळा महाविद्यालये (शैक्षणिक संस्था), रुग्णालये तथा सार्वजनिक हितांच्या संस्था मालकीच्या अथवा भाड्याने असल्या तरी प्रशासनातर्फे कारवाई सहसा होत नाही, परंतु तुमसर नगर परिषदेने तात्काळ कारवाई केली हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)