बिबट्याचा धुमाकूळ

By Admin | Updated: January 10, 2017 00:38 IST2017-01-10T00:38:20+5:302017-01-10T00:38:20+5:30

तालुका जंगलाने व्यापला आहे. काही दिवसांपासून जंगलाला लागून असलेल्या गावात बिबट्याने शिरकाव करून पाळीव प्राण्यांची शिकार करणे सुरू केले.

Screech | बिबट्याचा धुमाकूळ

बिबट्याचा धुमाकूळ

लाखांदूर : तालुका जंगलाने व्यापला आहे. काही दिवसांपासून जंगलाला लागून असलेल्या गावात बिबट्याने शिरकाव करून पाळीव प्राण्यांची शिकार करणे सुरू केले. दोन दिवसात तालुक्यातील मडेघाट येथे सायंकाळी गावात शिरून दोन बोकड व एका वासराची शिकार केली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे.
तालुक्यातील मडेघाट हे गाव जंगल व्याप्त आहे. यापूर्वी जवळच्या पुयार गावात बिबट्याने दहशत पसरवून अनेक कुत्रे व शेळ्यावर ताव मारला होता. आता सायंकाळी मडेघाट येथे गावकाऱ्यांच्या समोर शेळ्यांच्या नरड्यांचा घोट घेणे सुरु केले. त्यामुळे ग्रामस्थ लाठ्याकाठ्या घेऊन रात्र काढतात. मात्र गावकऱ्यांना न जुमानता आज बिबट्याने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरी बांधलेल्या शेळीची शिकार केली. गावकऱ्यांनी बिबट्याचा पाठलाग केला असता बिबट जंगलाच्या दिशेने पळाला. आतापर्यंत बिबट्याने दोन बोकड व एक वासराची शिकार केल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन परीक्षेत्राधिकारी दोनोडे यांना माहिती देऊन वन कर्मचारी मडेघाट येथे दाखल झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

पवनारा परिसरातही बिबट्याची दहशत
पवनारा : नाकाडोंगरी वन परी क्षेत्र अंतर्गत पवनारा येथे शेत शिवारात शेतकरी पुरुषोत्तम परतेती यांना बिबट्याचे दर्शन झाले. परिसरातील शेतकऱ्यांनी गावात पळ काढला. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पवनारा परिसर जंगलव्याप्त असून हिंस्त्र प्राण्याचा जास्त प्रमाणात वावर आहे. चार दिवसापूर्वी दावेझरी येथे बिबटयाने शेळी फस्त केली. पवनारा शेत शिवारात बिबटयाने एका रानडुकराची शिकार करुन त्याचा मृतदेह झाडावर लटकविला होता. याच परिसरात बिबटया चे वावर आहे हे स्पष्ट झाले. बिबटाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी करावे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाने याकडे लक्ष देऊन बिबटयाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Screech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.