शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांअभावी ओस पडल्या शाळा

By admin | Updated: June 29, 2016 00:36 IST

बदल्या करताना संबंधीत शाळेत किती शिक्षक शिल्लक राहतील याचा विचार करण्यात आलेला नाही.

प्रकरण शिक्षक बदलीचे : शिक्षकांमध्ये अजूनही रूजू होण्याबाबत संभ्रमावस्थाअशोक पारधी पवनीबदल्या करताना संबंधीत शाळेत किती शिक्षक शिल्लक राहतील याचा विचार करण्यात आलेला नाही. बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याने कित्येक शाळा शिक्षकांशिवाय सुरू झाल्या. तर काही शाळा सात वर्ग असूनही दोन शिक्षकांवर सुरू झालेल्या आहेत.ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे शासन निर्णयानुसार सार्वजनिक बदल्या २०१६ संबंधाने समुपदेशन कार्याशाळा येण्यात आली. शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या प्रकासकीय विनंती नुसार बदल्या करण्यात आल्या. तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानोरी व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कन्हाळगाव या दोन्ही शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. परंतु दोन्ही शाळेत प्रत्येकी दोन शिक्षक शिल्लक आहेत. जोड वर्गाची पद्धत फार जूनी आहे. नव्या पद्धतीने दोन्ही शिक्षकांने तीन तीन वर्ग एकत्र बसविले तरीही एक वर्ग शिल्लक राहतो. म्हणून शासनाचे धोरणानव्ये हा प्रकार म्हणजेच बहुवर्ग अध्यापन पद्धती आहे, असे पालकांनी समजावे काय, असा प्रश्न उद्भवलेला आहे. पवनी नगरपालिका क्षेत्रात एकमेव असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिल्याच दिवशी शिक्षकांशिवाय उघडण्यात आली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसापूर ही सुद्धा शिक्षकाशिवाय उघडण्यात आली. दोन्ही शाळेमधून प्रत्येकी दोन्ही शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. दोन्ही शाळेत उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षक रूजू झाले. परंतू शाळेच्या पहिल्याच दिवशी ते शाळेत हजर झाले नाही. पवनी येथील केंद्र प्रमुख जी.एल. गायधने व आसगावचे केंद्रप्रमुख के.डी. भुरे यांनी स्वत: शाळेत उपस्थित राहून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रथम दिवस साजरा केला.प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याचे प्रकरण सुरूवातीला मंत्रालयापर्यंत व नंतर न्यायालयापर्यंत पोहचले. त्यामुळे जिल्हाभर अशी अवस्था निर्माण झालेली आहे. शिक्षण क्षेत्रात असा धोळ करणारांनी विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष देवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही संकल्पना पुर्णत्वास न्यावे, अशी मागणी होवू लागली आहे.