१५ पासून शाळा सकाळपाळीत
By Admin | Updated: March 9, 2016 01:40 IST2016-03-09T01:40:43+5:302016-03-09T01:40:43+5:30
वाढत्या उष्णतामानामुळे जिल्ह्यातील शाळा सकाळपाळीत भरविण्यात याव्या यासह अन्य मागणीला घेऊन अखिल...

१५ पासून शाळा सकाळपाळीत
सभापतींशी चर्चा : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेला यश
भंडारा : वाढत्या उष्णतामानामुळे जिल्ह्यातील शाळा सकाळपाळीत भरविण्यात याव्या यासह अन्य मागणीला घेऊन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण सभापतींशी चर्चा केली. यात १५ मार्च पासून शाळा सकाळपाळीत सुरु करण्यात येईल असे आश्वासन शिक्षण सभापती राजेश डोंगरे यांनी दिले. या संदर्भात १४ मार्चला होणाऱ्या शिक्षण समितीच्या सभेत ठराव घेऊन पत्र काढण्याचे ठरविण्यात आले.
या चर्चेदरम्यान संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, राज्य पदाधिकारी नरेश कोल्हे, केशव बुरडे, शंकर नखाते, रमेश काटेखाये, रवी उगलमुगले उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्याशी धावती चर्चा केली.
यानंतर शिक्षण सभापती राजेश डोंगरे यांच्याशी शिक्षकांच्या प्रलंबित समस्या संदर्भात चर्चा केली. विशेषत: शाळा सकाळपाळीत भरविण्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला. तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम सर्व संघटनांना एकत्रित करून घेण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी निंबाळकर यांना करण्यात आली. याप्रसंगी रामेश्वर कांबळे, नेपाल तुरकर, अशोक ठाकरे, रवी उगलमुगले, मुकेश मेश्राम, सुधीर माकडे, रसेरा फटे, यशपाल बगमारे, बाळकृष्ण भुते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)