नियमबाह्य धावताहेत स्कूल बसेस
By Admin | Updated: June 29, 2014 23:46 IST2014-06-29T23:46:16+5:302014-06-29T23:46:16+5:30
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस नियमावली तयार करण्यात आली. मात्र शहरी भागात २० टक्के तर ग्रामीण भागात ८० टक्के स्कूल बस चालकांनी अद्यापही नियमांची पूर्तता केली नसल्याचे उघडकीस

नियमबाह्य धावताहेत स्कूल बसेस
शाळा संचालकांची उदासीनता : नियमावलीला ठेंगा
लाखनी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस नियमावली तयार करण्यात आली. मात्र शहरी भागात २० टक्के तर ग्रामीण भागात ८० टक्के स्कूल बस चालकांनी अद्यापही नियमांची पूर्तता केली नसल्याचे उघडकीस आले आहे. शाळांना सुरु होऊनही स्कूल बस चालक नियमांची पूर्तता करण्यासाठी गंभीर नसल्याचे चित्र आहे.
भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्कूल बसेस आहेत. यातील परिवहन महामंडळाच्या बसेस वगळता खासगी स्कूल बसेस, व्हॅन, आॅटो या आरटीओ कार्यालयांतर्गत येतात. यातील २० टक्के शाळांनी नियमांची पुर्तता केलेली नाही. स्कुल बससाठी आवश्यक नियमावलीचे पालन करण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये स्कुल बस परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश आरटीओ करीत आहेत. याशिवाय कार्यशाळेच्या माध्यमातून शाळांना स्कुलबस कशी असावी याची माहितीही देण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी आपलीच नाही, असे गृहीत धरून अनेक शाळा त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. स्कूल बसकडून नियमांची पूर्ततेकडे लक्ष दिले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. नियमांची पूर्तता होत नसेल तर आरटीओ दोषी स्कूल बसेस थेट निलंबनाची कारवाई करतात का? दंड वसूल होत आहे का? आरटीओ विभागाने तसे यावर आळा बसू शकतो.