शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या नियोजनासाठी सरपंचांची बैठक

By admin | Updated: May 4, 2017 00:32 IST

वाढत्या उन्हामुळे वीजेच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यांना कमी करण्याकरीता व सुरक्षित वीज पुरविण्याकरीता ....

सहकार्य अपेक्षित : वीज विभागाने दिली योजनांची माहितीपालांदूर : वाढत्या उन्हामुळे वीजेच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यांना कमी करण्याकरीता व सुरक्षित वीज पुरविण्याकरीता गावकऱ्यांची अर्थात सरपंचांची भूमिका सकारात्मक असावी. वेळी अवेळी खंडीत वीजेला सुरळित करण्याकरीता लागणाऱ्या विलंबनाला समजून घेत वीज विभागाला सहकार्य करावे, असे उपकार्यकारी अभियंता अमीत शहारे व सहायक अभियंता पंकज आखाडे यांनी सरपंचांना केले. मे हिट सुरू झाल्याने वीजेची मागणी वाढली आहे. पुरवठा कायम असून मागणीत लक्षणीय वाढ झाल्याने यंत्रणेवर ताण वाढला आहे. यामुळे खंडीत वीजेचे प्रमाण वाढून तत्काळ सेवेला विलंब होत असल्याने लाईनमन व ग्राहक यांच्या दुरावा वाढून संबंध बिगडतात, हे होऊ नये वास्तविकता काय असते याची जाणीव करूनच निर्णय घ्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले.पालांदूर परिसरातील बरेच गावच्या सरपंचांनी वीज विभागच्या निमंत्रणाला साथ देत वीज कार्यालय पालांदुरात हजेरी लावली होती. सरपंचांनी गावातील समस्यांचे निवेदन अभियंत्यांना देत आमच्या समस्या वरिष्ठांना कळविण्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच शुभांगी मदनकर (पालांदूर), गजानन शिवणकर (ढिवरखेडा), हेमंतकुमार सेलोकर (खुनारी) यांनी १६ तासांच्या थ्री फेज कृषीवीज वीजे संबंधाने तक्रार मांडली. यात १६ तासांच्या सलग वीजपुरवठ्याने गावातील सार्वजनिक, वैयक्तीक विहिरी आटल्या. हातपंप यात पाणी नाही, नळयोजनेलाही मुबलक पाणी नाही तसेच सिंगल फेजमुळे विजेच्या दाबाची समस्या आहे.शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्याला महत्व अधिक देत वीज विभागाने सुद्धा सावधगिरी बाळगावी. सार्वजनिक हिताला जिथे बांधा निर्माण होते अशाठिकाणी वीज पुरवठा करू नये, तसेच गावातनू ५०० मीटरच्या लांबच धानपिकाला वीज द्यावी. सध्या गावाला लागूनच धानपिक घेतले जात असल्याने पाण्याचा उपसा अधिक होत असून गावतलाव, विहिरींनी तळ गाठला आहे. वीज विभागाने कर्मचारी वाढवावे त्यांना ग्राहकांशी बोलण्याची परिभाषा समजावी ताण कितीही वाढला तरी ग्राहक याला जबाबदार नाही याची जाणीव लाईनमनला असावी. गावातील वीजवाहक तार लोंबकळत असतात त्यांना तणाव देवून अपघात टाळण्याला सहकार्य करावे. जीर्ण खांब बदलवावे, वाढीव खांब त्वरीत कार्यान्वीत करावे. कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट असावी, आदी सुचना वीज विभागाला सरपंचानी दिला. विशेष म्हणजे सहायक अभियंता पंकज आखाडे यांनी बोलविलेली सभा प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरल्याने नियमित बैठका होण्याचे सुद्धा सरपंचानी सांगितले. यावेळी सरपंच पुरूषोत्तम फटे (खराशी), यशवंत कठाणे (गुरठा), जयमाला राघोर्ते (रेंगोळा), जितेंद्र बोरकर (गोंडेगाव), प्रशांत मासुरकर (मांगली) आदी उपस्थितीत होते. (वार्ताहर)पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण जीवन ज्योती योजनेअंतर्गत २.६८ कोटीचा निधी मंजुर झाला आहे. लवकरच कामाचा शुभारंभ करण्यात येईल. यामुळे गावातील कमी दाबाचा प्रश्न निकाली निघायला मोठी मदत होईल. गावातील कमी दाबाचा प्रश्न निकाली निघायला मोठी मदत होईल. मे महिन्यात मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीचे कामे युद्धस्तरावर केली जाणार असून यावेळेत खंडीत वीजेचे प्रमाण वाढणार आहे. नवीन जीव कनेक्शन मागणीनुसार टप्पाटप्याने यांत्रिक सामुग्री तपासून घेण्यात येतील. तेव्हा सहकार्याची अपेक्षा अपेक्षित आहे.-अमित शहारे, कार्यकारी अभियंता पालांदूर (लाखनी).