संस्काराचे मोती स्पर्धा ज्ञानार्जनाचे स्त्रोत
By Admin | Updated: December 19, 2015 00:31 IST2015-12-19T00:31:36+5:302015-12-19T00:31:36+5:30
स्पर्धातुन विद्यार्थ्याची क्षमता ओळखता येत. अपयश आले की निराशा आणि यश मिळाले की आनंद मिळतो.

संस्काराचे मोती स्पर्धा ज्ञानार्जनाचे स्त्रोत
वरठी येथे बक्षीस वितरण : देवीदास डोंगरे यांचे प्रतिपादन
वरठी : स्पर्धातुन विद्यार्थ्याची क्षमता ओळखता येत. अपयश आले की निराशा आणि यश मिळाले की आनंद मिळतो. पण यश आणि अपयश या पलिकडे स्पर्धा पाहल्या पाहिजे. स्पर्धेत सहभाग आवश्यक आहे. परिणामाची चिंता नको. या माध्यमातून ज्ञानार्जन हा महत्वाचा भाग आहे. स्पर्धेच्या माध्यमातून बक्षिसे आणि अफाट ज्ञान पुरवणारे स्त्रोत म्हणजे संस्काराचे मोती ही स्पर्धा आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक संघटनेचे महासचिव देवीदास डोंगरे यांनी केले.
लोकमतद्वारे आयोजित संस्काराचे मोती स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य धर्मशिला उके व प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, रविकुमार डेकाटे, प्रा. अश्ववीर गजभिये, बाबू वाघमारे, युवराज कुथे व प्राचार्य सुहासिनी बरडे उपस्थित होते.
संस्काराचे मोती स्पर्धेत वरठी येथील जिल्हा परिषद हायस्कूल, नवप्रभात कन्या हायस्कूल व तथागत पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद हायस्कूलची रक्षा वंजारी द्वितीय क्रमांक नवप्रभात कन्या हायस्कूलची मिनाक्षी लोहबरे व तृतीय क्रमांक तथागत पब्लिक स्कूलचा आयुष मेश्राम यांनी पटकाविला. उर्वरित १० विद्यार्थ्यांना प्रोत्साहन बक्षिस देण्यात आले. यात अभय मांडवे, रोशन रोडे, लक्ष्मी दीपटे, प्रज्वल रामटेके, प्राची वहिले व टीना दुर्याेधन ढबाले यांचा समावेश होता.
संचालन व प्रास्ताविक लोकमत वार्ताहर तथागत मेश्राम व आभार हिंमत तायडे यांनी मानले. श
कार्यक्रमास मुकुंद ठवकर, वर्षा दाढी, गोपाल लांजेवार, हेमराज दहिवले, सुनीता गायधने, गणेश सार्वे, शोभा कडू, धनश्री कातोरे, दीपिका बांते, विलास गोटेफोडे, अरविंद साठवणे, गोपाल लांजेवार उपस्थित होते. (वार्ताहर)