सनफ्लॅग कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

By Admin | Updated: December 4, 2014 23:03 IST2014-12-04T23:03:50+5:302014-12-04T23:03:50+5:30

सनफ्लॅग कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात नियमित पगारवाढ व वाढीव बोनस संदर्भात अनेक महिन्यापासून वाटाघाटी सुरू होत्या. पण सनफ्लॅग कंपनी व्यवस्थापन कामगारांच्या प्रश्नाकडे

Sanfflag Workers Movement | सनफ्लॅग कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

सनफ्लॅग कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

काळ्या फिती लावून निषेध सुरू : पगारवाढ व बोनस प्रकरण
वरठी : सनफ्लॅग कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात नियमित पगारवाढ व वाढीव बोनस संदर्भात अनेक महिन्यापासून वाटाघाटी सुरू होत्या. पण सनफ्लॅग कंपनी व्यवस्थापन कामगारांच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. यामुळे आज दि.४ डिसेंबर पासून सनफ्लॅग कामगार संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून विरोध करण्यात आला. यावर लवकरात तोडगा न निघाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सनफ्लॅग कामगार संघटनेने दिली आहे.
सनफ्लॅग आर्यन एण्ड स्टिल कंपनी हे शुद्ध नफा कमवणारे उद्योग आहे. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या वर्गवारीनुसार दरवर्षी दिवाळी बोनस आणि दर तीन वर्षांनी नियमित पगारवाढ होते. पण गत अनेक महिन्यांपासून सनफ्लॅग व्यवस्थापन मंडळ कामगार संघटनाना चर्चेत अडवून ठेवले आहे. दिवाळी पुर्वी कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात चर्चा होवून तात्पुरता दिवाळी बोनस वाटप करून लवकरच पगारवाढसह बोनस करार करण्याचा समझोता आला होता. पण दोन महिन्यापासून सुरू असलेली समोर वाढत नसल्यामुळे कामगार संघटना आंदोलनाचा पवित्र्यात आहेत.
सनफ्लॅग कंपनीत नियमित स्थायी कामगार व कंत्राटी कामगार यांच्यासह दोन हजार कर्मचारी आहेत. नियमानुसार मार्च महिन्यात पगारवाढ देणे आवश्यक आहे. पण सनफ्लॅग कंपनी व्यवस्थापन हेतुपुरस्पर कामगाराच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे आजपासून कंपनीतील सर्व कामगारांनी काळ्याफिती लावून कामावर हजेरी लावली. आठवड्याभरात विविध प्रकारे आंदोलने करण्यात येणार आहेत. ५ डिसेंबर रोजी सर्व कामगार कंपनी व्यवस्थापनाकडे अ‍ॅडव्हान्स पगाराची मागणी करणार असून ६ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री व कामगार संघटनेचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहेत. ८ महिन्यापासून कंपनीचे कामगार हे पगार वाढीच्या प्रतिक्षेत आहेत. तीन वर्षापुर्वी झालेल्या करार संपुष्टात आला असून यावर्षी करार होवून कामगार पगारवाढ व्हायला पाहिजे होती. ८ महिन्यापासून फक्त कंपनी व्यवस्थापन चर्चेला बोलावले. पण तोडगा काढत नसल्यामुळे नाईलाजास्तव कामगारांना आंदोलन करावे लागत असल्याची माहिती सनफ्लॅग कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Sanfflag Workers Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.