नदीकाठावर रेतीचे डम्पिंग यार्ड

By Admin | Updated: July 22, 2015 01:05 IST2015-07-22T01:05:41+5:302015-07-22T01:05:41+5:30

बाम्हणी (तुमसर) येथे वैनगंगा नदीपात्रातून शेकडो ट्रक रेतीचा नियमबाह्य उपसा करून नदी काठावर साठा तयार केला आहे.

Sand dumping yard on river banks | नदीकाठावर रेतीचे डम्पिंग यार्ड

नदीकाठावर रेतीचे डम्पिंग यार्ड

प्रशासन अनभिज्ञ कसे?
माती दिसेपर्यंत उत्खनन
शेकडो ट्रक रेतीचा साठा

तुमसर : बाम्हणी (तुमसर) येथे वैनगंगा नदीपात्रातून शेकडो ट्रक रेतीचा नियमबाह्य उपसा करून नदी काठावर साठा तयार केला आहे. नदीपात्रात माती दिसेपर्यंत उपसा करण्यात आला आहे. परिणामी, नदीपात्रात विहिरीसारखे खोल खड्डे पडले आहेत. पर्यावरण नियमाचा सर्रास उल्लंघन करण्यात येऊनही भूजल सर्व्हेक्षण, खनिकर्म, जिल्हा व तहसील प्रशासन मूग गिळून गप्प आहे.
राज्य शासनाने सन २०१५ या वर्षात बाम्हणी (तुमसर) घाटाचा लिलाव केला होता. प्रचंड मोठा हा घाट आहे. या घाटात नियमबाह्य रेती उत्खनन केल्याचे प्रथमदर्शनी घाटावर भेट दिल्यावर दिसून येते. नदीपात्रातून रेतीचा उपसा करतानी किमान ३ फूट रेती शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. येथे कंत्राटदाराने माती दिसेपर्यंत रेतीचा उपसा केला आहे. वाहतुकीचे नियमसुद्धा पायदळी तुडविले जात आहे. नदी पात्रात विहिरीसारखे मोठे खड्डे येथे पडले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी येथे कंत्राटदाराने शेकडो ट्रक रेतीचा उपसा करून नदी काठावर मंदीर परिसर तथा एका खाजगी मालकीच्या शेतात ठेवली आहे. शेतमालकाला शेतीचा मोबदला देण्याचे त्याने कबुल केल्याची माहिती आहे. रेती उपसा केल्यावर जिथे रेती ठेवली ती शेती प्रथम अकृषक करणे गरजेचे होते. तुमसर तहसीलदाराकडे तसा रितसर अर्ज शेतमालक तथा कंत्राटदाराने केला नाही, अशी माहिती आहे. रेती उपसा केल्यावर जिथे रेती ठेवली ती शेती प्रथम अकृषक करणे गरजेचे होते. तुमसर तहसीलदाराकडे तसा रितसर अर्ज शेतमालक तथा कंत्राटदाराने केला नाही, अशी माहिती आहे. शेकडो ट्रक रेतीचा उपसा केला जात असतानी महसूल विभाग कां मूग गिळून गप्प होते हा संशोधनाचा विषय आहे. तुमसर शहरापासून अवघ्या चार कि़मी. अंतरावर बाम्हणी नदीघाट आहे. त्यामुळे महसूल विभागाचे अधिकारी इकडे फिरकले नाही काय, असा प्रश्न उपस्थित होतो.
गावात ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील यांच्या भूमीकेवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. येथे कंत्राटदाराने मिळविल्याची भूमिका धारण केली. भूजन सर्व्हेक्षण विभाग, जिल्हा खनिकर्म विभाग तथा तहसीलदारांचे या घाटांवर प्रत्यक्ष नियंत्रण असते. त्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह होत आहे. बाम्हणी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने तुमसर तहसीलदारांकडे दि. ७ जुलै रोजी रेती उपसा करून डम्पींग यार्ड तयार केल्याची तक्रार केली होती. दि. १७ जुलै रोजी त्या तक्रारीवर तहसीलदारांनी दखल घेवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. राजरोसपणे उपसा करून डम्पींग करताना प्रशासनाचे लक्ष गेले नाही.
भंडारा जिल्ह्यात सध्या धान खरेदी घोटाळा गाजत आहे. त्याप्रमाणे रेती उपसा तथा उत्खनन घोटाळा घडल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात संबंधितांची चौकशी करून कडक कारवाईची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
बाम्हणी येथील रेती घाटातून उपसा करून नदी काठावर ठेवल्याची तक्रार प्राप्त झाली. त्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यावर शासनाच्या नियमानुसार संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. स्थानांतरण होऊन आल्यावर लगेच निवडणुका लागल्या कार्यालयाबाहेर जाण्यास वेळच मिळाला नाही.
- डी.टी. सोनवाने
तहसीलदार तुमसर

Web Title: Sand dumping yard on river banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.