‘समानता’ ही स्त्री स्वातंत्र्याची ग्वाही
By Admin | Updated: March 10, 2016 00:58 IST2016-03-10T00:58:42+5:302016-03-10T00:58:42+5:30
स्त्रियांच्या सामाजिक व मानसिक गुलामींची मांडणी करताना भारताची समाज व कौटुंबिक व्यवस्था त्यांच्या शोषणासाठी कशा स्वरूपात काम करते, याचे विश्लेषण केले.

‘समानता’ ही स्त्री स्वातंत्र्याची ग्वाही
पटेल महाविद्यालयात उपक्रम : प्रिया शहारे यांचे प्रतिपादन
भंडारा : स्त्रियांच्या सामाजिक व मानसिक गुलामींची मांडणी करताना भारताची समाज व कौटुंबिक व्यवस्था त्यांच्या शोषणासाठी कशा स्वरूपात काम करते, याचे विश्लेषण केले. त्या पुढे म्हणाल्या, जोपर्यंत आपल्या समाजाची धार्मिक आणि सामाजिक मूल्यव्यवस्था बदलत नाही, तोपर्यंत स्त्री-पुरुष समानता स्थापित होणे शक्य नाही, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रिया शहारे यांनी केले.
स्थानिक जे.एम. महाविद्यालयात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रगती महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. जयश्री सातोकर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी.आय. शहारे, स्त्री अध्ययन केंद्राचे समन्वयक डॉ. प्रदीप मेश्राम, प्रा. ममता राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रिया शहारे म्हणाल्या, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी दिलेला लढा स्त्रियांनी आणि पुरुषांनीही समजून घ्यावा आणि स्त्री-स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करावा, असे आव्हान त्यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनीना केले.
या प्रसंगी डॉ. जयश्री सातोकर यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्रियांचे सक्षमीकरण यांचा संबंध अधोरेखित केला. सावित्रीने यमाबरोबर वादविवाद केला किंवा गार्गी ने याज्ञवल्काबरोबर वादविवाद केला त्यातून त्यांची विद्वता दिसून येते. स्त्रियांनी ज्ञानाच्या प्राप्तीकडे वळावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमता अधिग्रहित करावी, असे सांगितले.
डॉ. डी.आय. शहारे यांनी विद्यार्थींनी रूढी परंपरेतून मुक्त होऊन वैज्ञानिक विचार अंगिकारायला हवा, असे मत व्यक्त केले. तार्किक आणि विवेकी विचाराशिवाय त्या त्यांच्या मानसिक गुलामीतून मुक्त होऊ शकणार नाहीत. कार्यक्रमाच्या आयोजक प्रा. ममता राउत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जागतिक महिला दिनाचा इतिहास आणि महत्व विशद केले. संचालन तृप्ती गणवीर हिने तर आभार प्रदर्शन स्त्री अध्ययन केंद्राचे समन्वयक डॉ. प्रदीप मेश्राम यांनी केले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रा. ढोमणे यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असा संदेश दिला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या रा.से.यो. विभागाने घेतलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धांचे पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रा. रमेश जयनाकर, प्रा. दीपक भगत, जितसिंग लिल्हारे आणि रत्नाकर नंदनवार यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)