ज्ञानेश्वर कळंबे यांना समाजरत्न पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:30 IST2020-12-24T04:30:19+5:302020-12-24T04:30:19+5:30

पालांदूर : कोरोना काळात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याची दखल राज्यस्तरीय मदत या सामाजिक संस्थेने घेत शिक्षक ज्ञानेश्वर ...

Samajratna Award to Dnyaneshwar Kalambe | ज्ञानेश्वर कळंबे यांना समाजरत्न पुरस्कार

ज्ञानेश्वर कळंबे यांना समाजरत्न पुरस्कार

पालांदूर : कोरोना काळात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याची दखल राज्यस्तरीय मदत या सामाजिक संस्थेने घेत शिक्षक ज्ञानेश्वर कळंबे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती मान्यवर मंडळीत आमदार अभिजित वंजारी, गिरीश पांडव ,ऊर्जा मंत्री नितीन राऊत, काँग्रेस कमिटीचे नेते तानाजी वनवे, दीनानाथ पडोळे, नगरसेविका हर्षला मनोज साबळे, आदीच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र दुपट्टा पुष्पगुच्छ व संविधान भेट देत शब्द सुमनांनी कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. ज्ञानेश्वर कळंबे हे लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यातील मऱ्हेगाव येथे जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. नागपूर येथील अठराव्या राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलनात हा सन्मान सोहळा पार पडला.

Web Title: Samajratna Award to Dnyaneshwar Kalambe