लाखनी तालुक्यातील आरोग्यसेवा ‘सलाईन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:16+5:30

लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणी आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. अपघाताच्या नेहमीच घटना घडतात. पोलिसात तक्रारी झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असते. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात बीएएमएस डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांना एमएलसी करण्याचे अधिकार नाही. त्यामुळे जखमींना घेवून भंडारा येथे जाण्याशिवाय पर्याय नसतो.

On Saline, a healthcare facility in Lakhani taluka | लाखनी तालुक्यातील आरोग्यसेवा ‘सलाईन’वर

लाखनी तालुक्यातील आरोग्यसेवा ‘सलाईन’वर

ठळक मुद्देडॉक्टरांचा अभाव : इमारत, रुग्णवाहिका, निवासी डॉक्टर आदींची कमतरता, रुग्णांचे हाल

चंदन मोटघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : ग्रामीण आरोग्य सेवेवर शासन कोट्यवधी रूपयांचा खर्च करीत असली तरी लाखनी तालुक्यातील आरोग्य सेवा मात्र सलाईनवर असल्याचे दिसत आहे. आरोग्य केंद्र इमारत, रुग्णवाहिका आणि निवासी डॉक्टरांची कमतरता असल्याने ग्रामीण रुग्णांचे मोठे हाल होत आहे.
लाखनी तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालय, पाच प्राथमिक आरोग्य केंद्र, अ‍ॅलोपॅथिक व आयुर्वेदिक दवाखाने आहे. परंतु सद्यस्थितीत लाखनी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो.
लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणी आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. अपघाताच्या नेहमीच घटना घडतात. पोलिसात तक्रारी झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असते. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात बीएएमएस डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांना एमएलसी करण्याचे अधिकार नाही. त्यामुळे जखमींना घेवून भंडारा येथे जाण्याशिवाय पर्याय नसतो.

रिक्त पदांचे ग्रहण
१९९९ मध्ये लाखनी तालुका निर्मितीनंतर ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. सुरूवातीपासूनच ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद अद्यापही भरले नाही. दोन पदे रिक्त आहे. एमबीबीएस महिला डॉक्टर नाही. चार वैद्यकीय अधिकाºयापैकी केवळ एकच पद भरलेले आहे. एक डॉक्टर वैद्यकीय अधीक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहे. येथे दररोज ५०० ते ६०० बाह्यरुग्णांची नोंद होते. यासोबतच शिपाई व सफाई कामगारांची पदे रिक्त आहे.

पोलिसांची डोकेदुखी
लाखनी हे संवेदनशील गाव आहे. तालुक्यात दोन पोलीस स्टेशन आहे. पालांदूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनगृह नसल्याने मृतदेह लाखनी येथे आणावे लागते. त्यामुळे पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी वैद्यकीय अहवाल आवश्यक असतो. परंतु पोलिसांना वैद्यकीय अहवाल मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. भंडारा येथे जाण्याची वेळ पोलिसांवर येते.

Web Title: On Saline, a healthcare facility in Lakhani taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य