साकोलीवासीयांनी पाळला कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:26 IST2016-04-26T00:26:11+5:302016-04-26T00:26:11+5:30
येथील प्रगती कॉलनी साकोली येथे रामनवमीच्या दिवशी लावण्यात आलेल्या बॅनरची जाळपोळ करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली नाही.

साकोलीवासीयांनी पाळला कडकडीत बंद
प्रकरण बॅनर जाळल्याचे : आरोपींना शोधण्यात पोलिसांना अपयश, दिवसभर शहरात शांतता
साकोली : येथील प्रगती कॉलनी साकोली येथे रामनवमीच्या दिवशी लावण्यात आलेल्या बॅनरची जाळपोळ करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली नाही. या कारणावरुन बजरंग दलातर्फे आज साकोली बंदचे आयोजन करण्यात आले होते. या घटनेचा निषेध म्हणून आज साकोली कडकडीत बंद होती.
प्रगती कॉलनी साकोली येथे १४ ला प्रभु श्री रामनवमीनिमित्त प्रभु श्रीरामाचे चित्र असलेला बॅनर लावण्यात आला होता. मात्र काही समाज कंटकांनी हिन्दु धर्मीयांच्या भावना दुखावून धार्मिक तेठ निर्माण करण्याचा प्रयत्नातून प्रभु श्रीरामाचे बॅनर जाळले.
या प्रकरणाची तक्रार बजरंग दलातर्फे १९ ला पोलीस स्टेशन येथे देण्यात आली व सोबतच सिसीटीव्हीची फुटेजही देण्यात आली. तक्रार देऊन तब्बल सात दिवसाचा कालावधी लोटला. मात्र पोलिसांनी अजुनपर्यंत आरोपीला अटक केली नाही.
या घटनेचा निषेध म्हणूनबजरंग दलातर्फे आज साकोली बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय व औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने कडकडीत बंद होती.
या दरम्यान बजरंग दलातर्फे साकोलीत रॅली काढून पोलीस प्रशासन व बॅनर फाडणाऱ्या आरोपीविरुध्द निदर्शने देण्यात आली. यानंरत तहसिलदार यांच्यासोबत चर्चा करुन आरोपींना सात दिवसात अटक करण्याची मागणी करण्यात आली व प्रशासनातर्फे आरोपीला अटक करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी तालुका संयोजक पुष्कर करंजेकर, छावा संग्राम परिषदेचे अध्यक्ष झनकलान लांजेवार दिपक लिवरे, अमित चन्ने, प्रणीत पालीवाल, ऋषभ पांडे, याज्ञीक उके, अनिकेत चिरवतकर, निलेश सिंग, रोशनसिंग, सोनु भुरे, करन कुरंजेकर, सौरभ कापगते, तिलक वैद्य, हर्षल जावरकर, मयुर रेवतकर, मनिष आचार्य, सुमेध खनघन, बंटी आंबेकर, लोकेश गभणे, विकास गायधने, यशवंत इखार, निशांत पडोळे, ईद्रायणी कापगत,े सिनरन कापगते, दिक्षा भुरे, पुनम चांदेवार, शितल लाडे, मनिष कापगते, किशोर बावने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)