साकोली ग्रामपंचायतचे लवकरच रूपांतर नगरपंचायतीत होणार

By Admin | Updated: January 29, 2015 23:01 IST2015-01-29T23:01:29+5:302015-01-29T23:01:29+5:30

मागील बऱ्याच वर्षापासून साकोलीवासीयासाठी दिवास्वप्न ठरलेली नगरपंचायतीची कधीही घोषणा होऊ शकते. या नगरपंचायतीची शासनस्तरावरून प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून

Sakoli Gram Panchayat will soon be converted into Nagar Panchayat | साकोली ग्रामपंचायतचे लवकरच रूपांतर नगरपंचायतीत होणार

साकोली ग्रामपंचायतचे लवकरच रूपांतर नगरपंचायतीत होणार

साकोली : मागील बऱ्याच वर्षापासून साकोलीवासीयासाठी दिवास्वप्न ठरलेली नगरपंचायतीची कधीही घोषणा होऊ शकते. या नगरपंचायतीची शासनस्तरावरून प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून पंचायत समिती सदस्यांना त्यांचे क्षेत्र नगरपंचायतीत समाविष्ट होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
मागील वर्षी शासनाने महाराष्ट्रातील १३८ तालुकास्तरीय ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याची घोषणा केली होती. यामध्ये जिल्ह्यातील साकोली, लाखनी व मोहाडी या तीन ग्रामपंचायतीचा समावेश होता. तेव्हापासून या नगरपंचायतीच्या प्रक्रियेला शासनस्तरावरून सुरवात झाली आहे. वर्षभरापासून ग्रामविकास मंत्रालय व नगरविकास मंत्रालय यासंदर्भात संबंधित पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरून माहिती मागवित आहे. त्यामुळे या नगरपंचायतीची सर्वच प्रक्रिया पुर्णत्वास गेली असून अंतीम टप्प्याची तयारी बाकी आहे.
साकोली पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य मदन रामटेके यांना नुकतेच जिल्हाधिकारी यांचे पत्र प्राप्त झाले असून या पत्राच्या अनुषंगाने साकोली पंचायत समिती गणाचे सर्व क्षेत्र ८५८.५२ हेक्टर आर हे नगरपंचायतीत समाविष्ट होत आहे. त्यासाठी सदर क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे पंचायत समिती सदस्याचे सदस्यत्व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम २५७ अन्वये रद्द करणे क्रमप्राप्त आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधित सदस्याला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सुनावणीची संधी देण्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे साकोली नगरपंचायतीची घोषणा कधीही होऊ शकते यात मात्र आता शंका नाही.

Web Title: Sakoli Gram Panchayat will soon be converted into Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.