महोत्सवात रंगल्या ‘सखी’
By Admin | Updated: January 7, 2016 01:03 IST2016-01-07T01:03:23+5:302016-01-07T01:03:23+5:30
लोकमत सखीमंच तुमसरच्या वतीने सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

महोत्सवात रंगल्या ‘सखी’
तुमसर येथील कार्यक्रम : विविधांगी कार्यक्रमांचा समावेश
तुमसर : लोकमत सखीमंच तुमसरच्या वतीने सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्यामसुंदर सेलीब्रेशन हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सखींनी आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान गर्जनाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पटले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषद उपाध्यक्षा सरोज भुरे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, तिरोडा पंचायत समिती सभापती उषा किंदरले, हर्षल वाहाने, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजकुमार माटे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखा प्रबंधक यशवंत निखारे, संजय तांबी, अनिल मलेवार, शंकर जायस्वाल, अल्का जायस्वाल, जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे परीक्षक एस कुमार डान्स अॅकेडमी भंडारा व सोना बग्गा कोरिओग्राफर यांच्या उपस्थितीत सखींनी आपले नृत्यकौशल्य सादर केले. या महोत्सवात सखींनी कला सादर करून कार्यक्रमाचा आनंद लुटला. एकलनृत्य स्पर्धेत वैशाली गायधने (गोबरवाही) यांना प्रथम, आरती जामुनपाने (नाकाडोंगरी) द्वितीय, विनिया वरवटे (तुमसर) तृतीय तर प्रोत्साहनपर बक्षिस वनिता बारस्कर यांना देण्यात आले.
युगलनृत्य स्पर्धेत विनया वरवटे व निमा रिनायत यांना प्रथम क्रमांकाचे तर आरती पराते व यशोदा निखारे यांना द्वितीय तर नितू चौधरी व सोनी जायस्वाल यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. समूहनृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार ड्रीम ग्रुप तुमसरच्या रंजना ठाकरे, सोनाली कावळे, वंदना इखार, रिना चकोले, ज्योती भोयर, रिमा रिनायत, द्वितीय पुरस्कार गोबरवाही ग्रुपच्या वैशाली गायधने, रचना धारगावे, माया देरकर, वंदना वासनिक, योगीता बघेल, बबिता वरकडे, तृतीय पुरस्कार मोहाडी ग्रुपच्या यशोदा निखारे, आरती पराते, शशीकला भिमटे, सुषमा हेडाऊ, पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्र दर्शन तुमसरच्या प्रिती तंगडपल्लीवार, डॉ.प्रिया बडवाईक, अनिता गुरलवार, मिना टेटे, सोनाली सोनवाने, नितू चौधरी, साखरवाडे, द्वितीय पुरस्कार पर्यावरण सिहोराच्या शांता तुरकर, बिंदू शुक्ला, संगीता तुरकर, मेघा शुक्ला, तनू पटले, पूजा तुरकर, एकपात्री अभिनयात अनिता गुरलवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.संचालन अनिता गुरलवार, आभार रितू पशिने यांनी मानले. कार्यक्रमाला कल्याणी भुरे, मिरा भट, कल्पना पटेल, राहुल भुतांगे, करुणा धुर्वे, रोशनी माटे, रंजना माटे, प्रतिमा नंदनवार, निशा पशिने, दुर्गा धकाते, प्रिती बांगरे, प्रिया हिंगे, पल्लवी भुतांगे, पूजा थोटे, संगीता तिवारी, प्राची पटले, माधुरी कुळकर्णी, सुषमा उकरे, कल्पना राऊत, उमा वटरे आदींनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)