सालेकसाची नगरपंचायत जंगलात
By Admin | Updated: April 12, 2015 01:16 IST2015-04-12T01:16:21+5:302015-04-12T01:16:21+5:30
शासनाने प्रत्येक तालुक्याचे ठिकाण जे ग्राम पंचायत प्रकाशनात मोडत होते त्या सर्व तालुक्याच्या ठिकाणची ग्राम पंचायत समाप्त केली आहे.

सालेकसाची नगरपंचायत जंगलात
सालेकसा : शासनाने प्रत्येक तालुक्याचे ठिकाण जे ग्राम पंचायत प्रकाशनात मोडत होते त्या सर्व तालुक्याच्या ठिकाणची ग्राम पंचायत समाप्त केली आहे. त्या तालुक्याच्या तहसीलदाराला नगर रचनेची व्यवस्था होईपर्यंत प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. परंतु सालेकसा येथे मुख्यालयाबाहेरचा भाग नगर पंचायतीत आला असून मुख्यालयाचे ठिकाण आमगाव खुर्द ग्राम पंचायतचा प्रशासनात चालत आहेत.
मुख्यालयाबाहेरील ८ ते १० किती पर्यंतचा भाग नगर पंचायतीत आला असून सालेकसा नगर पंचायतीचा विद्रुप चेहरा निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य निकषाप्रमाणे ज्या भागाचे शहरीकरण झालेले असते तो भाग त्यातील लोकसंख्येनुसार नगर परिषद नगरपालीका क्षेत्रतत मोडला जातो व जो भाग ग्रामीण भागात मोडतो त्याला ग्राम पंचायतमध्ये ठेवले जाते. मात्र येथे ज्या नावाने तालुका मुख्यालयाचा कारभार चालत आहे. त्या नावाने असलेली ग्राम पंचायत नगर पंचायत निर्माण करण्याचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय खऱ्या सालेकसावासियांना प्रतीकुल ठरला आहे. नगर पंचायतीत न येणे त्यांना दुर्देवी वाटत आहे.
सालेकसा तालुक्याचा संपुर्ण कारभार सालेकसाच्या नावाने चालत असला तरी या गावाचा पुर्ण समावेश आमगाव खुर्द ग्राम पंचायतच्या अंतर्गत आहे.
यात तहसील कार्यालय पंचायत समिती बसस्थानक, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, कृषी कार्यालय वन परिक्षेत्राधिकारी कार्यालय, दोन वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय दोन हायस्कुल, महाराष्ट्र बँक, को-आॅपरेटीव बँक, ग्रामीण बँक व इतर सर्व सहकारी बँक, आठवडी बाजार, विद्युत कार्यालय या सह सर्व शासकीय कार्यालय आणि मुख्य बाजापेठ ही सालेकसाच्या नावाने चालत असली तरी या सर्वस्थळांचा समावेश आमगाव खुर्द ग्राम पंचायतीत मोडतो. त्यामुळे या ठिकाणी भौतिक सोयी सुविधा पुरविणे समस्याचे निराकरण करणे तसेच कर वसूली इत्यादी सर्व जबाबदारी आमगाव खुर्द ग्राम पंचायतीची आहे. आमगाव खुर्द ग्राम पंचायतीत २०११ च्या जनगणेनुसार एकून लोकसंख्या पाच हजार १९७ एवढी असून यात अनुसूचित जातीचे ८१८ तर अनुसूचित जमातीचे ६२० लोक निवास करीत आहेत. एकुण कुटुंबाची संख्या ११४४ असून या ग्राम पंचायतीला पाच वार्डात विभागले गेले आहे. आणि ग्रा.पं. सदस्य संख्या १३ आहे. येथील सचिवाची जबाबदारी ग्राम विकास अधिकारी सांभाळत आहेत. (वार्ताहर)