साकोली, लाखनीचा पाणीपुरवठा ठप्प
By Admin | Updated: July 12, 2014 00:50 IST2014-07-12T00:50:37+5:302014-07-12T00:50:37+5:30
कधी ओला तर कधी सुका दुष्काळ. या निसर्गाच्या चक्रव्युहात शेतकरी व जनसामान्य माणूस विसरल्या जात आहे.

साकोली, लाखनीचा पाणीपुरवठा ठप्प
संजय साठवणे साकोली
कधी ओला तर कधी सुका दुष्काळ. या निसर्गाच्या चक्रव्युहात शेतकरी व जनसामान्य माणूस विसरल्या जात आहे. मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र यावर्षी निसर्ग मात्र जास्तच कोपलेला दिसतो. पावसाळा लागून एक महिना लोटला तरी पाऊस बेपत्ता आहे. सकाळ आशेचा किरण घेऊन येते. मात्र आता आकाशाकडे पाहावे तर आकाशही कोरडे व नदीनाले तलावही कोरडेच.
साकोली तालुक्यातून चुलचंद नदी वाहते. या चुलबंद नदीवर म्हणजेच दुर्गाबाई डोह आहे. या डोहात दरवर्षी मुबलक पाणी राहते. या डोहाची खोली अजूनपर्यंत कुणी मोजली नसली तरी एका खाटेला जेवढी दारी लागते तेवढी खोली या डोहाची आहे. अशी माहिती आहे. मात्र यावर्षी या डोहाचेही पाणी सुकले आहे. त्यामुळे नागरिकांना या दुष्काळाची परिस्थिती येणार याची शक्यता वाटत आहे. याच चुलबंद नदीवर दुर्गाबाई डोहाच्या जवळच निम्न चुलबंद प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे सर्व गेट लाऊन तयार आहेत. फक्त उर्वरित कॅनल व पंपहाऊसचे काम बाकी आहेत. यावर्षी उशिरा पाणी अडविण्यात आले. मात्र दुर्बळ क्षेत्रातील शेतकऱ्यांना अजूनही शेतीचा मोबदला मिळाला नाही.
पाणी अडविल्यामुळे या प्रकल्पावर आधारित साकोली व लाखनी तालुक्यातील जलशुद्धीकरण योजना सुरु करण्यात आली. या योजनेकडून दोन्ही तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठा सुरु होता.या पाणीपुरवठ्यासाठी दररोज ४० ते ५० लाख लिटर पाणी दररोज लागत होते. मात्र पावसाने दगा दिल्यामुळे हे अडविलेले पाणी व डोहातील पाणी आटल्याने प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे सर्व गेट लाऊन तयार आहेत. फक्त उर्वरीत कॅनल्स व पंपहाऊसचे काम बाकी आहेत. यावर्षी उशिरा पाणी अडविण्यात आले. मात्र डुबीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना अजूनही शेतीचा मोबदला मिळाला नाही.
पाणी अडविल्यामुळे या प्रकल्पावर आधारित साकोली व लाखनी तालुक्यातील जलशुद्धीकरण योजना सुरु करण्यात आली. या योजनेकडून दोन्ही तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठा सुरु होता. या पाणीपुरवठ्यासाठी दररोज ४० ते ५० लाख लिटर पाणी दररोज लागत होते. मात्र पावसाने दगा दिल्यामुळे हे अडविलेले पाणी व डोहातील पाणी आटल्याने दि. १ जुलै पासून साकोली व लाखनी तालुक्यातील पाणी पुरवठा ठप्प पडला आहे.